Ganesh Visarjan 2025: खबरदार! विसर्जन मिरवणुकीत चोरी कराल तर.., पुणे पोलिसांची तगडी पेट्रोलिंग

Last Updated:

Ganesh Visarjan 2025: विसर्जन मिरवणुकीसाठी पुण्यात 80000 पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

Ganesh Visarjan 2025: खबरदार! विसर्जन मिरवणुकीत चोरी कराल तर.., पुणे पोलिसांची तगडी पेट्रोलिंग
Ganesh Visarjan 2025: खबरदार! विसर्जन मिरवणुकीत चोरी कराल तर.., पुणे पोलिसांची तगडी पेट्रोलिंग
पुणे: लाडक्या गणरायाला आज निरोप देण्याची वेळ आली आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त पुण्यात भव्य विसर्जन मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीत शहरातील पाच मानाच्या गणपतींसह अनेक गणेश मंडळं सहभागी होणार आहेत. यापार्श्वभूमीवर पुणे पोलीस सज्ज झाले आहेत. विसर्जन मिरवणुकीसाठी तब्बल 80000 पोलिसांचा फौज फाटा शहरात तैनात करण्यात आला आहे. मिरवणुकीतील गर्दीवर नियंत्रण, महिला व लहान मुलांची सुरक्षा, वाहतुकीचं नियोजन व गर्दीचा फायदा उचलून चोरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आलं आहे.
गणेशोत्सवातील सर्वात मोठा सोहळा असलेली विसर्जन मिरवणूक पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. हजारो गणेशभक्त, शेकडो मंडळं आणि लाखोंचा जनसमुदाय बघता, पुणे शहर पोलीस दलाकडून विशेष सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दीचा फायदा घेणाऱ्या चोरट्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी यंदा चार स्तरांमध्ये पेट्रोलिंगची आखणी केली आहे.
advertisement
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि गर्दीचा फायदा उचलणाऱ्या चोरट्यांसाठी पोलिसांकडून ए आय, चेहरा ओळख प्रणाली, ड्रोन कॅमेरे, जीपीएस ट्रॅकर, सीसीटीव्ही कॅमेरा, मोबाईल नियंत्रण कक्ष आणि अँटिड्रॉम गनचा वापर केला जाणार आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर आणि विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर सशस्त्र पोलीस, गुन्हे शाखेची पथकं, पोलीस मित्रांची मदत घेतली जाणार आहे. गर्दीचा फायदा उचलून मोबाईल चोरी, साखळी चोरी आणि पाकीटमार करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. यासाठी गर्दीत सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस फिरणार आहेत.
advertisement
मोबाईल सर्व्हिलियन्स व्हॅनची करडी नजर
पुणे पोलिसांच्या ताफ्यात काही दिवसांपूर्वी समाविष्ट करण्यात आलेल्या मोबाईल सर्व्हिलियन्स व्हॅन्सची चोरट्यांवर करडी नजर असणार आहे. विसर्जन मिरवणूक मार्गावर होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर सीसीटीव्ही कॅमेरा आणि ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. दरवर्षी विसर्जन मिरवणुकीत अनेक चोरटे गर्दीचा फायदा घेतात आणि चोऱ्या करतात. या घटनांना आळा घालण्यासाठी यावर्षी पुणे पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ganesh Visarjan 2025: खबरदार! विसर्जन मिरवणुकीत चोरी कराल तर.., पुणे पोलिसांची तगडी पेट्रोलिंग
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement