advertisement

T20 World Cup : टीम इंडियाच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर, फायनलआधी बहिण अन् दाजीचा मृत्यू, तरी वर्ल्ड कप जिंकवला!

Last Updated:

टीम इंडियाने 2026 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला आहे. भारताने फायनलमध्ये न्यूझीलंडचा 96 रननी पराभव केला आहे. पण या फायनलच्या आधी टीम इंडियाच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर कोसळला.

टीम इंडियाच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर, फायनलआधी बहिण अन् दाजीचा मृत्यू, तरी वर्ल्ड कप जिंकवला!
टीम इंडियाच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर, फायनलआधी बहिण अन् दाजीचा मृत्यू, तरी वर्ल्ड कप जिंकवला!
अहमदाबाद : टीम इंडियाने 2026 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला आहे. भारताने फायनलमध्ये न्यूझीलंडचा 96 रननी पराभव केला आहे. मॅचच्या आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी संध्याकाळी राजकुमार शर्मा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर त्यांचा मुलगा अभिषेक शर्माचा सराव पाहण्यासाठी आले होते. इशान किशनचे वडील प्रणव पांडे यांचाही तोच प्लान होता, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. अहमदाबादमध्ये त्यांचा मुलगा सराव करत होता आणि नंतर त्याने मॅचमध्ये 25 बॉलमध्ये 54 रन करून 3 अप्रतिम कॅच पकडले. मुलाचा खेळ पाहण्याऐवजी इशान किशनचे वडील सिलिगुडीतील एका शवगृहात बसले होते.
शुक्रवारी, प्रणव पांडे अहमदाबादला जाण्यासाठी पाटणा विमानतळावर जात असताना, त्यांना एका कार अपघाताची दुःखद बातमी मिळाली ज्यामध्ये त्यांच्या दोन नातेवाईकांचा मृत्यू झाला. तरुण कुटुंब लग्नाला उपस्थित राहण्यासाठी जात होते.
"अनर्थ हो गया. हम लोग बहुत बडी मुसीबत में हैं' असं इशान किशनच्या वडिलांनी टाईम्स ऑफ इंडियासोबत बोलताना सांगितलं. या अपघातामध्ये इशान किशनची चुलत बहिण आणि मेहुण्यांचं निधन झालं. चमत्कारिकरित्या या अपघातामध्ये जोडप्याची सहा महिने आणि 3 वर्षांची दोन मुलं वाचली. 'आम्हाला सर्वांनाच धक्का बसला आहे. इशानला त्यांना भेटायला जायचं होतं, पण फायनलमुळे तो परत येऊ शकला नाही. तो पूर्णपणे अस्वस्थ आहे,' असं प्रणव पांडे म्हणाले आहेत.
advertisement

इशान किशन दु:खात, कुणासोबतच बोलला नाही

जेव्हा इशान किशनने टी-20 वर्ल्ड कपमध्ये तिसरे अर्धशतक झळकावले तेव्हा त्याने ड्रेसिंग रूमकडे बॅट वर केली आणि आकाशाकडे इशारा करण्यासाठी थोडा वेळ घेतला. तो सहसा असे करत नाही. सामन्याच्या आदल्या दिवशीही, जेव्हा त्याचे इतर सहकारी मैदानामध्ये सराव करत होते तेव्हा किशन नेहमीसारखा वागत नव्हता. तसंच बॅटिंग करताना त्याचा शॉट नेहमीसारखा लांब जात नव्हता. फिल्डिंग कोच टी. दिलीपसोबत फिल्डिंग करतानाही, तो इशान नव्हता जो नेहमी टीमच्या सराव सत्रात जीवंतपणा आणायचा.
advertisement
मैदानाची सवय होण्यासाठी इशानने वेगवेगळ्या कोनातून आणि मैदानाच्या विविध भागातून कॅच घेतले. मॅचच्या आदल्या दिवशी केलेल्या या सरावाचा इशान किशनला फायनलमध्ये फायदा झाला. जसप्रीत बुमराहच्या बॉलिंगवर वर त्याने एक जबरदस्त कॅच घेत रचिन रवींद्रला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. नंतर बाऊंड्रीजवळ त्याने टिम सायफर्ट आणि लगेचच डॅरिल मिचेलचाही कॅच पकडला.
टीम इंडियाची नेट प्रॅक्टिस सुरू असताना खेळाडूंनी इशानच्या खांद्यावर हात ठेवून त्याला आधार दिला. तसंच कुटुंबातील जवळच्या सदस्यांना गमावलेल्या इशानचा मूड हलका करण्याचा प्रयत्न भारतीय खेळाडूंनी केला.
advertisement
टीम इंडियाची नेट प्रॅक्टिस सुरू असतानाच पाठीमागून इशान भैया ऑटोग्राफ, असे ओरडण्याचे आवाजही येत होते. इशानने सुरूवातीला लहान मुलांच्या या विनंतीकडे दुर्लक्ष केलं, पण अखेर इशान त्या मुलांकडे गेला आणि त्यांना ऑटोग्राफ आणि सेल्फीही दिल्या. बच्चों को देने दो, असं म्हणत इशानने तिथे असलेल्या लहान मुलांसोबतच वेळ घालवला, पण त्याने वयाने मोठ्या असलेल्या चाहत्यांना ऑटोग्राफ आणि सेल्फी दिली नाही.
advertisement
वर्ल्ड कप फायनलच्या पूर्वसंध्येला इशान किशन स्वतःला सावरण्यासाठी धडपडत होता, पण मॅचच्या दिवशी मात्र त्याने पहिले बॅटिंग आणि त्यानंतर फिल्डिंगमध्ये स्वतःला झोकून दिलं. आपल्या भावाला वर्ल्ड चॅम्पियन होताना पाहायची बहिणीची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही, तसंच इशाननेही त्याच्या कारकिर्दीतील सगळ्यात मोठा क्षण त्याच्या बहिणीसोबत साजरा करू शकला नाही.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : टीम इंडियाच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर, फायनलआधी बहिण अन् दाजीचा मृत्यू, तरी वर्ल्ड कप जिंकवला!
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement