Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Gold News: चीनमध्ये एका व्यक्तीला बदक कापताना त्याच्या पोटातून सोन्याचे कण सापडल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. हुनान प्रांतातील लाँगहुई काउंटी येथे घडलेल्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
बीजिंग : चीनच्या मध्य भागात एक विचित्र आणि आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला बदक कापताना त्याच्या पोटातून सोन्याचे कण सापडले. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार फेब्रुवारी महिन्यात हुनान प्रांतातील लाँगहुई काउंटीयेथे राहणाऱ्या लिऊ नावाच्या व्यक्तीला बदकाच्या पोटात हे सोन्याचे कण आढळले.
या कणांची ‘बर्निंग टेस्ट’ करून तपासणी करण्यात आली आणि ते खरे सोने असल्याची प्राथमिक पुष्टी झाली. या सोन्याचे एकूण वजन सुमारे 10 ग्रॅम असल्याचे सांगितले जात आहे. त्याची किंमत सुमारे 12,000 युआन म्हणजेच अंदाजे 1.62 लाख रुपये इतकी असल्याची माहिती Xinwenfang ने दिली आहे.
पुढील वर्षासाठी शुभ संकेत
लिऊच्या वडिलांनी या घटनेला येणाऱ्या वर्षासाठी शुभ संकेत मानले आहे. त्यांच्या मते ही बदके नदीजवळ मोकळ्या जागेत वाढवली जात होती. हा परिसर पूर्वी सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध होता. त्यामुळे बदकाने सोन्याचे कण असलेली माती गिळली असण्याची शक्यता आहे.
advertisement
तज्ज्ञांच्या मते माणूस किंवा प्राणी यांचे शरीर सोने पचवू किंवा शोषून घेऊ शकत नाही. साधारणपणे ते पचनसंस्थेतून बाहेर पडते. मात्र मोठे किंवा अशुद्ध सोन्याचे तुकडे प्राण्यांच्या किंवा माणसांच्या आतड्यांमध्ये अडथळा निर्माण करू शकतात किंवा विषारी परिणाम होऊ शकतात.
गावात आधीही अशा घटना
लिऊने सांगितले की अशी घटना पूर्णपणे नवी नाही. गावातील काही इतर लोकांनाही यापूर्वी बदकांच्या पोटात सोन्याचे कण सापडले होते, मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात कधीच नाही. दरम्यान Longhui County Natural Resources Bureau ने Jiupai News ला सांगितले की या कणांची खरीखुरी सोन्याची असल्याची अंतिम खात्री करण्यासाठी व्यावसायिक संस्थेकडून तपासणी करणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की अशा प्रकारची घटना या भागात होण्याची शक्यता आहे. मागील वर्षीही या परिसरातील नदीत वाळू धुताना गावकऱ्यांना 10 ग्रॅमपेक्षा जास्त सोने सापडल्याची घटना घडली होती.
advertisement
सोन्याचा मालक कोण?
या काउंटीमधून वाहणारी Chenshui River उत्तर ते दक्षिण दिशेने वाहते. या भागात पूर्वी सोन्याचे कण सापडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. 1970 ते 1990 या काळात येथे सोन्याच्या शोधामुळे स्थानिक स्तरावर ‘गोल्ड रश’ही सुरू झाला होता. नंतर प्रशासनाने खासगी खाणकामावर बंदी घातली.
एका अधिकाऱ्याने The Paper ला सांगितले की बदकाच्या पोटात सापडलेल्या सोन्याचा मालक कोण असेल हे निश्चित करणे कठीण आहे. ही घटना Tang Dynasty (इ.स. 618 ते 907) काळातील एका जुन्या प्रथेला आठवण करून देते. त्या काळात शेतकरी बदक आणि हंस यांच्या विष्ठेतून सोन्याचे कण गोळा करत असत.
advertisement
चीनमधील सोन्याचे दर
मार्च महिन्यात चीनमध्ये सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 1,140 ते 1,190 युआन दरम्यान होती. भारतीय चलनात हा दर सुमारे 14,850 ते 15,480 रुपये प्रति ग्रॅम इतका होतो. आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये अनेक कुटुंबे सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. काही व्हाइट-कॉलर कर्मचारी गोल्ड-लिंक्ड फंडमध्ये गुंतवणूक करत आहेत, तर तरुण ग्राहक स्वस्त आणि नव्या प्रकारचे सोन्याचे प्रॉडक्ट खरेदी करत असल्याचेही दिसून येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 09, 2026 1:18 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल









