मिळालेल्या माहितीनुसार शिवडीच्या रेतीबंदर रोडवरील गुरुकृपा चाळीत ही आज दुपारी 3.15 वाजता घटना घडली आहे. या घटनेत सूरूवातीला एका चाळीतील घरात शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली होती. ही आग पुढे पुढे पसरत गेली आणि
एका घरात असलेल्या गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला.त्यानंतर आजूबाजूच्या घरात असलेल्या 3 सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली.एकूण ४ सिलिंडरच्या स्फोटांनी संपूर्ण परिसर हादरून गेला होता.
advertisement
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलासोबतच शिवडी पोलीस, पालिकेचा वॉर्ड स्टाफ आणि बेस्टचे कर्मचारीही तातडीने मदतीसाठी पोहोचले आहेत.तसेच या घटनेनंतर बरदारीचा उपाय म्हणून परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
सुदैवाने या भीषण स्फोटात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाने परिसराची नाकेबंदी केली असून बचावकार्य सुरू आहे.