TRENDING:

Ro Ro Service : मुंबईवरुन सिंधुदुर्गला अवघ्या पाच तासांत; रो-रो सेवा कधीपासून सुरु होणार; तिकीटाचे दर किती?

Last Updated:

Mumbai Vijaydurg Ro Ro Service : मुंबईहून आता सिंधुदुर्गला जाण्यासाठी तुम्हाला महामार्गे जाण्याची गरज नाही. लवकरच रो-रो सेवा सुरु होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : प्रवाशांनो एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. मुंबई ते कोकण दरम्यान सुरू होणाऱ्या रो-रो सेवेची तारीख जाहीर झाली आहे तसेच या समुद्री प्रवासासाठी प्रवाशांना किती तिकीट दर मोजावे लागतील याचीही माहिती समोर आली आहे. चला जाणून घेऊया या सेवेचे संपूर्ण दर.
Mumbai Vijaydurg Ro Ro Service
Mumbai Vijaydurg Ro Ro Service
advertisement

पाच तासांत मुंबई ते सिंधुदुर्ग

मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते कोकण दरम्यान ही सेवा अखेर एप्रिलमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. भाऊचा धक्का येथून सुटणारी ही बोट अवघ्या पाच तासांत विजयदुर्ग येथे पोहोचणार आहे. त्यामुळे सध्या 12 ते 14 तास लागणारा मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास टाळता येणार आहे.

ही सेवा सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळ यांनी घेतला आहे. सुरुवातीला ही सेवा ऑगस्ट 2025 मध्ये गणेशोत्सवाच्या काळात सुरू करण्याचे जाहीर झाले होते. मात्र तांत्रिक अडचणी आणि आवश्यक परवानग्या न मिळाल्याने सेवा सुरू होऊ शकली नाही.

advertisement

आता सागरी मंडळाने पुन्हा एकदा प्रायोगिक तत्त्वावर महिनाभर सेवा चालवण्यासाठी कंत्राटदार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मार्चपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करून एप्रिलमध्ये सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. या सेवेचा मोठा फायदा कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना तसेच हापूस आंबा उत्पादकांना होणार आहे. वाहनांसह प्रवास करता येणार असल्याने वेळ आणि इंधन दोन्हीची बचत होईल.

advertisement

जाणून घ्या तिकीट दर

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दाळ शिजण्याचं टेन्शन संपलं, सोलापूरच्या गृहिणीची कमाल, पुरणपोळीसाठी बनवलं प्रिमिक्स, पाहा काय करायचं?
सर्व पहा

मुंबई-कोकण रो-रो सेवेचे तिकीट दर अंदाजे जाहीर झाले आहेत. ज्यामध्ये प्रवासी तिकीट 2,500 रुपयांपासून सुरू होईल. प्रिमियम, बिझनेस आणि फर्स्ट क्लाससाठी साधारण 4,000, 7,500 आणि 9,000 रुपये द्यावे लागतील. एवढेच नाही तर दुचाकी, कार, बससाठीही वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत.

मराठी बातम्या/मुंबई/
Ro Ro Service : मुंबईवरुन सिंधुदुर्गला अवघ्या पाच तासांत; रो-रो सेवा कधीपासून सुरु होणार; तिकीटाचे दर किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल