थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी सगळेच सध्या घराबाहेर पडले आहेत. कुणी मुंबईच मरीन ड्राईव्ह गाठलं आहे, तर काहीजण आपआपल्या गाड्यांनी अख्खं पालथं घालणार आहे. या सगळ्या गोष्टीचे आधीचे नियोजन झालं आहे,त्यामुळे आतापर्यंत सगळेच घराबाहेर पडले आहेत.पण या घराबाहेर पडलेल्या नागरीकांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण मुंबईहून ठाणे आणि विरारच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर आली आहे. खरं तर ही वाहतुक कोंडी हा निव्वळ आजचा विषय नाही आहे, तर मागच्या अनेक दिवसांपासून या भागात वाहतुक कोंडी होत आहे.त्यामुळे ही समस्या पाहता थर्टी फर्स्टच्या आनंदात असणाऱ्यांचा मोठा हिरमोड होणार आहे.
advertisement
थर्टी फर्स्टच्या उत्साहात मुंबई ठाणे पश्चिम महामार्ग वर वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे आणि विरारकडे जाणाऱ्या लेंन वर वाहनाच्या रांगा रांगा लागल्या आहेत. आज संध्याकाळ 6:30 वाजल्यापासून दहिसर चेक नाका वर वाहनाच्या रांगा लागल्या आहे. नविन वर्षाच सण साजरा करण्यासाठी पर्यटक घराबाहेर पडल्याने महामार्गावर वाहतुकीच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे या समस्येमुळे नागरीकांच्या उत्साहावार विरजण पडणार आहे.
दरम्यान वाहतुक कोंडीची ही समस्या सोडण्यासाठी महामार्ग पोलीस चेक नाक्यावर दाखल झाली आहे.आता ही वाहतूक कोंडी सोडवण्यास महामर्ग पोलिसांना यश येते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मुंबईहुन घोडबंदर, फाउंटेन वरून विरारच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर प्रचंड वाहतुक कोंडी होत असते. ही निव्वळ आजची समस्या नाही आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून नागरीक या समस्येला सामोरे जात आहेत. या समस्येमुळे अनेक वाहनांना तासनतास वाहतुक कोंडीत अडकून पडाले लागते. मध्यंतरी एक अॅम्ब्युलन्स वाहतूक कोंडीत अडकून एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.या घटनेनंतर वाहतुकीच्या नियमात बदल करण्यात आले होते. पण परिस्थिती जैसे थेच आहेत.
