TRENDING:

माझ्या पतीने मला ग्रँड रोड.., मुंबईच्या पहिल्या डॉनच्याा मुलगी हसीन मस्तानचा आणखी एक खळबळजनक दावा

Last Updated:

हसीन मिर्झा हिचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आला. या व्हिडीओमध्ये तिने पुन्हाा एकदा आपल्या पतीविरोधात गंभीर आरोप केले आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
संकेत वरक, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

मुंबई : मुंबईचा पहिला डॉन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हाजी मस्तान यांची मुलगी हसीन मस्तान मिर्झा हिने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली होती. पण, आता हसीन मिर्झा हिच्या प्रकरणाने आता नवं वळण घेतलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये हसीनने आपल्या पतीवर अत्यंत गंभीर आरोप करत न्यायाची मागणी केली आहे.

advertisement

हसीन मिर्झा हिचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आला. या व्हिडीओमध्ये तिने पुन्हाा एकदा आपल्या पतीविरोधात गंभीर आरोप केले आहे.  "घटस्फोटाच्या काळात तिच्या पतीने तिला घराबाहेर काढून एका हॉस्टेलचा पत्ता दिला. मात्र ती तिथं पोहोचल्यावर तो परिसर ग्रँट रोडमधील रेड लाईट एरिया असल्याचं समजलं. त्या ठिकाणी एका अनोळखी व्यक्तीने मदत करत तिला पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचवलं. पोलिसांनी प्राथमिक मदत केली, मात्र नंतर तिला पुन्हा माघारी पाठवण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे.

advertisement

हसीन मस्तान यांनी २०१३ साली पतीविरोधात न्यायालयात दाद मागितली होती. मात्र सुनावणीला कोणीही हजर न राहिल्याने २०२३ मध्ये हे प्रकरण बंद करण्यात आलं. स्वतः आजारी असल्यामुळे न्यायालयात उपस्थित राहू शकले नसल्याचा दावा तिने केला आहे.

आता मात्र, हसीनने आपल्यावर झालेला अत्याचार, घरच्यांनी लावलेलं बेकायदेशीर लग्न, घटस्फोटानंतर संपत्ती आणि कागदपत्रं बळकावल्याचे गंभीर आरोप करत केस पुन्हा सुरू करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. दीर्घकाळ गप्प राहिल्यानंतर न्यायासाठी पुन्हा लढण्याचा निर्धार तिनं व्यक्त केला आहे.

advertisement

पती देश सोडण्याच्या तयारीत

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळीचे दर घसरले, आल्याचे भाव तेजीत, डाळींबाची काय स्थिती?
सर्व पहा

तिने व्हिडिओमध्ये असा दावा देखील केला की, कोर्टात याचिका दाखल होताच तिचा पती देश सोडण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ कारवाई करून त्याला अटक करावी, अशी मागणी तिने केली आहे.या प्रकरणामुळे हसीन मस्तान यांच्या आरोपांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलं गेलं असून, आता न्यायालयीन प्रक्रियेत पुढे काय घडतं याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
माझ्या पतीने मला ग्रँड रोड.., मुंबईच्या पहिल्या डॉनच्याा मुलगी हसीन मस्तानचा आणखी एक खळबळजनक दावा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल