TRENDING:

'तो मला प्रेमाने किकी-पुकी म्हणायचा...', विद्यार्थी अत्याचार प्रकरणात ट्विस्ट, मुंबईच्या शिक्षिकेने दाखवले स्क्रीनशॉट!

Last Updated:

मुंबईच्या एका प्रतिष्ठित शाळेमध्ये महिला शिक्षिकेने दहावीच्या विद्यार्थ्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. याप्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईच्या एका प्रतिष्ठित शाळेमध्ये महिला शिक्षिकेने दहावीच्या विद्यार्थ्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यावर कारमध्ये तसंच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केल्याचे आरोप झाले. तसंच शिक्षिका विद्यार्थ्याला दारू पाजायची आणि त्याला तणामुक्तीसाठी गोळ्याही द्यायची असा दावा मुलाच्या पालकांनी तक्रारीमध्ये केला, पण आता या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं आहे. आमच्या दोघांमध्येही घडलेल्या गोष्टी परस्पर संमतीने झाल्याचा दावा महिला शिक्षिकेने न्यायालयात केला आहे, लोकमतने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
'तो मला प्रेमाने किकी-पुकी म्हणायचा...', विद्यार्थी अत्याचार प्रकरणात ट्विस्ट, मुंबईच्या शिक्षिकेने दाखवले स्क्रीनशॉट! (Meta AI Image)
'तो मला प्रेमाने किकी-पुकी म्हणायचा...', विद्यार्थी अत्याचार प्रकरणात ट्विस्ट, मुंबईच्या शिक्षिकेने दाखवले स्क्रीनशॉट! (Meta AI Image)
advertisement

कोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज करताना शिक्षिकेने तिच्यात आणि विद्यार्थ्यामध्ये मोबाईवर झालेल्या चॅटिंगचे स्क्रीनशॉट सादर केले आहेत. तसंच महिलेने न्यायालयात एक प्रेमपत्र दाखवलं आहे, ज्यात तिने आपल्याला हे प्रेमपत्र विद्यार्थ्यानेच लिहिल्याचा दावा केला आहे. आमच्या दोघांमध्ये प्रेमसंबंध होतो, तो मला पत्नी म्हणायचा, प्रेमाने किकी आणि पुकी असं म्हणायचा, असंही महिला शिक्षिका न्यायालयात म्हणाली आहे.

advertisement

काय आहे प्रकरण?

मुंबईमधल्या एका प्रसिद्ध शाळेत इंग्रजी शिकवणाऱ्या 40 वर्षांच्या शिक्षिकेवर 16 वर्षांच्या सध्या 11वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी महिलेवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटकही करण्यात आली आहे. डिसेंबर 2023 साली हायस्कूलच्या वार्षिक कार्यक्रमासाठी नृत्य गट स्थापन करण्यात आला, त्यावेळी डान्स शिकवताना शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत जवळीक वाढवली, तसंच त्याच्या शरिराला वाईट पद्धतीने स्पर्श करू लागली. यानंतर जानेवारी 2024 मध्ये तिने विद्यार्थ्यासोबत पहिल्यांदा लैंगिक संबंध ठेवले.

advertisement

शिक्षिका विद्यार्थ्याला दक्षिण मुंबईतील आणि विमानतळाजवळील वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेली आणि तिथेही तिने विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलावर अत्याचार करण्याआधी शिक्षिकेने विद्यार्थ्याला दारूही पाजली, असंही पोलीस तपासात समोर आलं आहे.

विद्यार्थ्याचं आचरण बदललं

हा प्रकार सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्याचं आचरण बदललं, हे काही काळानंतर पालकांच्या लक्षात आलं. पालकांनी खोदून खोदून विचारल्यानंतर अखेर मुलाने त्याच्यासोबत घडलेला सगळा प्रकार सांगितला. दहावी संपून शाळेतून बाहेर पडण्यासाठी काही महिने शिल्लक असल्यामुळे शिक्षिका विद्यार्थ्याला सोडून देईल, म्हणून पालकांनी शांत राहण्याचा निर्णय घेतला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

वर्षाच्या सुरूवातीला मुलगा बोर्डाची परीक्षा पास झाला, पण तो शाळा सोडल्यानंतरही नैराश्येत बुडाला. शाळा संपल्यानंतरही शिक्षिकेने तिच्या घरातील एका कर्मचाऱ्यामार्फत पुन्हा मुलाशी संपर्क साधला आणि भेटायला बोलावलं, तेव्हा पालकांनी गुन्हा दाखल केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मराठी बातम्या/मुंबई/
'तो मला प्रेमाने किकी-पुकी म्हणायचा...', विद्यार्थी अत्याचार प्रकरणात ट्विस्ट, मुंबईच्या शिक्षिकेने दाखवले स्क्रीनशॉट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल