TRENDING:

Mumbai Dabbawala : नोकरदारांना सहा दिवस घरचा डबा बंद; 30 मार्चपासून डबेवाल्यांची मोठी सुट्टी; कारण काय?

Last Updated:

Mumbai Dabbawala : मुंबईतील डबेवाले काही दिवसांसाठी सुट्टीवर जाणार आहेत. या काळात टिफिन सेवा बंद राहणार असून हजारो मुंबईकरांना जेवणासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बामती आहे. काही दिवसांसाठी मुंबई शहरातील डबेवाले हे सुट्टीवर जाणार आहेत, त्यामुळे टिफीन सेवा ही बंद राहणार आहे. या सुट्टीमुळे रोज ऑफिसला शिवाय कामावर जाणाऱ्या लाखो मुंबईकरांना मोठा फटका बसणार आहे.
ग्रामदेवतेच्या उत्सवासाठी डबेवाले सुट्टीवर
ग्रामदेवतेच्या उत्सवासाठी डबेवाले सुट्टीवर
advertisement

मुंबईकरांनो डबा स्वतः घेऊन जा

मुंबई शहरातील डबेवाले ही सर्वात प्रसिद्ध अशी सेवा आहे. दरदिवशी लाखो डबे वेळेवर पोहचवणारी ही सेवा 30 मार्चपासून ते 4 एप्रिल या दिवसापर्यंत थांबणार असल्याने काहींना पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. यात खास करुन ऑफिसमध्ये घरगुती जेवणावर अवलंबून असणाऱ्या लोकांना आता बाहेरचे जेवण घ्यावे लागेल किंवा त्यांना स्वत: जेवणाची सोय करावी लागणार आहे.

advertisement

सुट्टीचं कारण काय?

डबेवाले हे दरवर्षी त्यांच्या ग्रामदेवतेच्या उत्सवासाठी जातात आणि त्या दिवसांत पूर्णपणे कामही बंद ठेवतात. ही त्यांची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळेच या काळात डबेवाल्यांची सेवा बंद राहणार असल्याची माहिती आदीच सांगितली जाते, जेणेकरुन जे अवलंबून आहेत या सेवेवर त्यांना नियोजन करता येईल.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याचे दर घसरलेलेचं, लिंबू खातंय चांगलाच भाव, द्राक्षाची काय स्थिती?
सर्व पहा

मुंबईकरांनी या 6 दिवसांच्या सुट्टीदरम्यान जेवणाची व्यवस्था करुन ठेवावी असे आवाहनही करण्यात आलेले असून 5 एप्रिलपासून ही टिफीन सेवा नेहमीप्रमाणे सुरु होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Dabbawala : नोकरदारांना सहा दिवस घरचा डबा बंद; 30 मार्चपासून डबेवाल्यांची मोठी सुट्टी; कारण काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल