थेट लोकल प्रवासाची सुविधा
सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून कर्जतला जाण्यासाठी केवळ कल्याणमार्गे पर्याय उपलब्ध आहे. मात्र, हा नवीन मार्ग सुरू झाल्यानंतर प्रवाशांना पनवेलमार्गेही कर्जतला जाण्याचा दुसरा जलद पर्याय मिळेल. या मार्गावर पनवेल, चिखले, पोयंजे (मोहापे), चौक आणि कर्जत अशी पाच स्थानके असणार आहेत. याचा मोठा फायदा नवी मुंबई आणि कर्जत परिसरातील प्रवाशांना होणार आहे.
advertisement
कामाची सद्यस्थिती आणि तांत्रिक वैशिष्ट्ये
या प्रकल्पाचे सुमारे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी संपवण्याचे नियोजन आहे. या मार्गावर तीन महत्त्वाचे बोगदे असून त्यात २.६ किमी लांबीच्या 'वावरले' या मुंबई उपनगरी रेल्वेवरील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या बोगद्यांमध्ये पहिल्यांदाच खडीमुक्त रुळांचा वापर करण्यात आला असून मजबूतीसाठी काँक्रिटचा आधार देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपनगरी रेल्वेचा विस्तार ४०० किमीपार करण्याची घोषणा केली होती, ती आता या प्रकल्पामुळे पूर्णत्वास येत आहे. सध्या मध्य रेल्वेवर २५४ किमी आणि पश्चिम रेल्वेवर १२४ किमी मार्गावर लोकल धावतात. या नवीन ३० किमीच्या भरणीमुळे मुंबईचे रेल्वे जाळे अधिक विस्तारणार आहे.
