तरुणीला प्रेमाचं स्वप्न दाखवलं… पण जे झालं ते
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय फनीकर (वय 32) याने 31 वर्षीय तरुणीशी प्रेमाचे नाटक सुरु केले होते. त्याने सुरुवातीला प्रेम, काळजी आणि लग्नाचे आश्वासन देत तिचा विश्वास जिंकला. त्यानंतर सुरू झाला पैशाचा खेळ. ज्यात त्याने तिला विदेशात नोकरीची संधी, अचानक आलेले खर्च, वैद्यकीय गर, व्यवसायात गुंतवणूक अशा अनेक बनावट गोष्टींचे कारण दिले. मात्र तरुणावर ठेवलेला विश्वासामुळे तरुणीने चक्क वेगवेगळ्या ठिकाणांहून तब्बल 23 लाखांचे कर्ज उचलले, जे की त्या पैशांनी ती त्याची मदत करु शकेल.
advertisement
काही दिवसांनंतर तरुणींवर असलेले कर्ज हळूहळू वाढत राहिले,पण असे असूनही तरुणीने त्याला कशाचीही झळ भासून दिली नाही. मात्र, काही दिवसांनंतर पैशांची गरज संपताच आरोपीने आपला रंग बदलला. तरुणीने त्याच्याकडे लग्नाचा विषय काढताच त्याची टाळाटाळ सुरु केली. धक्कादायक म्हणजे त्याने तिला सरळ नकार देत संपर्कही तोडला. फोन स्विच ऑफ, सोशल मीडिया ब्लॉक, भेटण्यासाठी नकार या सर्वांमुळे तरुणीला अखेर सर्व समजले.
शेवटी झालेल्या फसवणुकीची जाणीव होताच पीडित तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली आणि तिच्या सोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी तरुणा विरोद्धात गुन्हा दाखल करुन घेतलेला असून तपास सुरु केला आहे.
