TRENDING:

Mumbai : रेल्वेचा नवा निर्णय! पहिली लोकल 'या' वेळेत धावणार, मुंबईकरांनी प्रवासाला निघण्यापूर्वी वेळापत्रक तपासा

Last Updated:

Train TimeTable Change : मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना असून लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. हा बदल कधीपासून लागू होणार आणि कोणत्या मार्गावर परिणाम होणार याची सविस्तर माहिती जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी असून अनेक लोकल तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा बदल नेमका कधीपासून असणार आहे शिवाय हा निर्णय का घेण्यात आला याबाबतही सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
News18
News18
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार 1 जानेवारी 2026 पासून अंमलात येणार असून लोकल गाड्यांचा प्रवास अधिक जलद व्हावा शिवाय वेळेचे काटेकोर पालन व्हावे आणि प्रवाशांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी ही सुधारणा करण्यात आली आहे.

विशेषतहा डहाणू रोड विभागातील लोकल सेवांमध्ये मोठे बदल करण्यात आले असून अप आणि डाऊन दिशेने धावणाऱ्या ईएमयू गाड्यांचे सुधारित वेळापत्रक पश्चिम रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. या नव्या वेळापत्रकात डहाणू रोड, विरार आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान धावणाऱ्या लोकल सेवांचा समावेश आहे.

advertisement

जाणून घ्या नवीन वेळापत्रक

नवीन वेळापत्रकानुसार अनेक डाऊन दिशेने धावणाऱ्या ईएमयू सेवा पहाटे 5.03 वाजल्यापासून चर्चगेट स्थानकावरून सुटणार आहेत. त्यामुळे पहाटे प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि कामगार वर्गाला याचा मोठा फायदा होणार आहे तसेच सकाळच्या वेळेत लोकल सेवांचे नियोजन अधिक सुकर होण्याची अपेक्षा आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महिलांनी दारू पिणं चांगलं की वाईट? पुरुषाच्या तुलनेत शरिरावर कसा होतो परिणाम?
सर्व पहा

पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की या सुधारित वेळापत्रकासंबंधी सविस्तर माहिती संबंधित स्थानकांवरील स्टेशन मास्तरांकडे तसेच अधिकृत सूचनाफलकांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी बदललेल्या वेळांची माहिती घेऊनच घराबाहेर पडावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : रेल्वेचा नवा निर्णय! पहिली लोकल 'या' वेळेत धावणार, मुंबईकरांनी प्रवासाला निघण्यापूर्वी वेळापत्रक तपासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल