भारताच्या उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्व आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वरळीतील पारशी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुंबई पोलिसांकडून रतन टाटा यांना मानवंदना दिली. अंत्यसंस्कारावेळी राजकीय, सामाजिक, चित्रपटसृष्टीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्वसामान्य नागरिकांनीही रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्यासाठी घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तर रतन टाटा यांच्या निधनानं उद्योग क्षेत्रातील एका युगाचा अस्त झाला.अशी भावना सर्व क्षेत्रातून उमटत आहे.