Ratan Tata Successors : रतन टाटांच्या उद्योग साम्राज्याचा वारस कोण? ही नावे आहेत चर्चेत

Last Updated:

रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीचा आणि उद्योग साम्राज्याचा वारस कोण होणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

Ratan Tata Successors टाटांच्या उद्योग साम्राज्याचा वारस कोण?
Ratan Tata Successors टाटांच्या उद्योग साम्राज्याचा वारस कोण?
Ratan Tata Successors: जगभरातील उद्योग क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे भारतीय उद्योजक रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. रतन टाटांच्या निधनाने उद्योग जगतच नव्हे तर भारतावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीचा आणि उद्योग साम्राज्याचा वारस कोण होणार, याची चर्चा सुरू झाली आहे.
रतन टाटा यांच्या नावे 3800 कोटींची संपत्ती आहे असल्याचे म्हटले जाते. रतन टाटा हे अविवाहित होते. त्यामुळे टाटा समूहाची धूरा त्यांच्या पश्चात कोणाच्या हाती जाणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

रतन टाटा यांचा वारस कोण?

रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा वारस कोण होणार, त्यांची जागा कोण घेणार, या चर्चांना उधाण आले आहे. टाटा समूहाच्या उद्योग साम्राज्याची धुरा कोणाच्या हाती जाणार, याचीही चर्चा रंगली आहे.
advertisement
टाटा समूहाची धुरा कोणाच्या हाती असणार, याचे नियोजन आधीच करण्यात आले आहे. एन. चंद्रशेखर यांनी २०१७ मध्ये होल्डिंग कंपनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली. टाटा कुटुंबातील इतर सदस्य देखील टाटा समूहातील इतर उद्योगांचे नेतृत्व करत आहेत.

शर्यतीत कोण आघाडीवर?

रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांचे नाव सध्या आघाडीवर आहे. नोएल टाटा हे नवल टाटा यांच्या दुसऱ्या पत्नी सिमोन यांचे पुत्र आहेत. कुटु्ंबातील सदस्य म्हणून त्यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, नोएल टाटा यांच्या वयामुळे कदाचित त्यांच्या तीन मुलांपैकी एकावर टाटा समूहाची जबाबदारी दिली जाऊ शकते.
advertisement

माया, नेविल आणि लिआ टाटा

नोएल टाटा यांना तीन मुले आहेत. टाटा समूहाचे संभाव्य वारसदार म्हणून त्यांच्या नावाची चर्चा आहे. नोएल यांची मोठी मुलगी लिआ टाटा यांनी स्पेनच्या माद्रिद येथील प्रतिष्ठित बिझनेस स्कूलमधून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. २००६ मध्ये ताज हॉटेल रिसोर्टस अॅण्ड पॅलेसेसमध्ये त्या अस्टिटंट सेल्स मॅनेजर म्हणून टाटा समूहाशी जोडल्या गेल्या.सध्या त्या टाटा समूहाच्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत.
advertisement
तर, नोएल यांची दुसरी मुलगी माया टाटा समूहातील प्रमुख फायान्स सर्व्हिस कंपनीमध्ये विश्लेषक म्हणून टाटा कॅपिटलमध्ये आपलं करिअर सुरू केले. तर, त्यांचे मोठे भाऊ नेविल टाटा यांना ट्रेंट कंपनीच्या माध्यमातून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली
इतर संबंधित बातमी: 
advertisement
मराठी बातम्या/मनी/
Ratan Tata Successors : रतन टाटांच्या उद्योग साम्राज्याचा वारस कोण? ही नावे आहेत चर्चेत
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement