IT क्षेत्राचे मास्टरमाईंड, Ratan Tata यांची 1378000000000 रुपयांची कंपनी बनवण्यामागे 'या' दिग्गज व्यक्तीचा हात
- Published by:News18 Marathi
Last Updated:
रतन टाटा यांच्या टाटा समुहाने गेल्या काही वर्षात प्रत्येक उद्योग क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवलाय.
रतन टाटा यांच्या टाटा समुहाने गेल्या काही वर्षात प्रत्येक उद्योग क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवलाय. टाटा समुहाने कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची कंपनी उभा केली होती, त्यामुळे भारताच्या आयटी क्षेत्राला आणि भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला होता.
पुढे जाऊन भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी नावारुपाला आली. या कंपनीची मुल्य तब्बल 1378000000000 रुपये इतकी आहे.
मात्र, तुम्हाला माहितीये का? टीसीएस कंपनीची स्थापना पाकिस्तानमधील जन्माला आलेल्या एका व्यक्तीने केली आहे. भारतीय आयटी उद्योगाचे जनक फकीरचंद कोहली यांनी टीसीएसची स्थापना केली होती.
स्वातंत्र्यापूर्वी फकीरचंद कोहली यांचा जन्म पेशावरमध्ये झाला होता. त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठात शिक्षण पूर्ण केलं आणि बीए आणि बीएससीची पदवी मिळवली होती. तसेच त्यांनी सूर्वणपदक देखील पटकावलं होतं.
advertisement
फकीरचंद कोहलीने 1951 मध्ये टाटा इलेक्ट्रिकमध्ये रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी जेआरडी टाटा यांच्या समर्थाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची स्थापना केली. समाजाला सामाजिक आणि आर्थिक प्रगतीची चालना देण्यासाठी टीसीएसचा हा उपक्रम यशस्वी ठरला.
पुढील पाच वर्षात कंपनीच्या वाढीचा दर अधिक चांगला राहिला. बँकिंग आणि युटिलिटीजसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये मोठी वाढ दिसून आली. त्यामुळे टीसीएसची प्रतिमा अधिकच मजबूत झाल्याचं दिसून आलं.
advertisement
दरम्यान, 21 वं शतक सुरू होण्याआधी वाय टू केच्या समस्येवेळी आयटी कंपनीमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. त्यावेळी टीसीएसने यशस्वीरित्या समस्या हाताळली. त्यामुळे देखील टीसीएसचं मोठं नाव झालं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 10, 2024 12:04 AM IST
मराठी बातम्या/मनी/
IT क्षेत्राचे मास्टरमाईंड, Ratan Tata यांची 1378000000000 रुपयांची कंपनी बनवण्यामागे 'या' दिग्गज व्यक्तीचा हात