advertisement

8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय

Last Updated:

8th Pay Commission: केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगासाठी अधिकृत पोर्टल सुरू करत कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थेट सूचना देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. वेतन, भत्ते आणि पेन्शन संरचनेतील संभाव्य बदलांवर आता सर्व स्तरांवरील मते मागवण्यात येत आहेत.

Rapid Read
Translate
News18
News18
नवी दिल्ली: केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची घडामोड झाली आहे. 8व्या वेतन आयोगाबाबत मते आणि सूचना नोंदवण्यासाठी केंद्र सरकारने अधिकृत पोर्टल सुरू केले असून, यामुळे आगामी वेतन आणि भत्ते संरचनेवर थेट प्रभाव टाकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. वेतनवाढ, पेन्शन पुनर्रचना आणि भत्त्यांबाबत काय बदल होऊ शकतात, याकडे लाखो कर्मचारी आणि निवृत्त अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
8व्या वेतन आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू
8व्या केंद्रीय वेतन आयोगासाठी https://8cpc.gov.in हे स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. आयोगाची औपचारिक स्थापना झाल्यानंतर या पोर्टलद्वारे मंत्रालये, विभाग, कर्मचारी, पेन्शनधारक आणि संबंधित घटकांकडून सूचना मागवण्यात येत आहेत.
आयोगाने अधिक चांगले आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी सर्व स्तरांवरील मते जाणून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी MyGov पोर्टलवर 18 प्रश्नांचा सविस्तर प्रश्नावली फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार सर्व प्रतिसाद गोपनीय ठेवले जाणार असून, कोणत्याही व्यक्तीचे नाव स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार नाही. सर्व सूचना एकत्रितपणे विश्लेषण केले जाईल.
advertisement
कोण देऊ शकतो सूचना?
8व्या वेतन आयोगासाठी व्यापक स्तरावरून सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये केंद्रीय मंत्रालये आणि विभागातील कर्मचारी, केंद्रशासित प्रदेशांतील कर्मचारी, न्यायव्यवस्थेतील अधिकारी आणि न्यायालयीन कर्मचारी, नियामक संस्थांचे सदस्य, कर्मचारी संघटना, निवृत्त सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक, संशोधक, प्राध्यापक आणि अभ्यासक, सामान्य नागरिक याशिवाय मंत्रालये आणि विभागांनी नियुक्त केलेले अधिकृत नोडल अधिकारी देखील सूचना सादर करू शकतात.
advertisement
सूचना पाठवण्याची अंतिम तारीख
8व्या वेतन आयोगासाठी अभिप्राय पाठवण्याची अंतिम मुदत 16 मार्च निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर प्रश्नावली भरता येणार नाही.
कसे द्यायचे मत?
सूचना देण्यासाठी MyGov पोर्टलवरील अधिकृत लिंक वापरणे बंधनकारक आहे. यासाठीची लिंक पुढील प्रमाणे: https://www.mygov.in/mygov-survey/8th-central-pay-commission-questionnaire/
वापरकर्त्यांनी मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडीद्वारे लॉगिन किंवा नोंदणी करावी लागेल. त्यानंतर सहा अंकी OTP टाकून प्रश्नावली पूर्ण करता येईल. सरकारने स्पष्ट केले आहे की केवळ MyGov पोर्टलवरील ऑनलाइन प्रतिसादच ग्राह्य धरले जातील. कागदी स्वरूपातील पत्रव्यवहार, ई-मेल किंवा पीडीएफ स्वरूपातील सूचना आयोग विचारात घेणार नाही.
view comments
मराठी बातम्या/मनी/
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement