Naval Dockyard : मुंबईतील खळबजनक घटना, नौदलाच्या डॉकयार्ड परिसरात आगीची घटना समोर, घटनास्थळाचा VIDEO
- Published by:Sachin S
Last Updated:
मुंबईतील नौदल डॉकयार्ड परिसरातील कचरा साठवण विभागात संध्याकाळच्या सुमारास आग लागली होती. या आगीची माहिती स्वत: नौदलाने दिली.
मुंबई: मुंबईतील सर्वाधिक सुरक्षित आणि नौदलाच्या देखरेखेखाली असलेल्या नौदल डॉकयार्ड परिसरात आगीची घटना समोर आली आहे. नौदल डॉकयार्ड परिसरातील कचरा साठवण विभागात आग लागली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, नौदलाच्या परिसरात आग लागल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील नौदल डॉकयार्ड परिसरातील कचरा साठवण विभागात संध्याकाळच्या सुमारास आग लागली होती. या आगीची माहिती स्वत: नौदलाने दिली.
नौदलाच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत वेगाने कारवाई करत आग नियंत्रणात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचेही नौदलाकडून स्पष्ट करण्यात आले.
advertisement
मात्र, आगीचे व्हिडीओ समोर आले आहे. नौदलाच्या परिसरात दूरहून आग लागल्याचं दिसून आलं. आगीच्या धुराचे लोट दूरपर्यंत दिसत होते. आग आता विझवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे, पण आगीचं कारण अजून गुलदस्त्यात आहे.
मुळात मुंबईतील नौदल डॉकयार्ड हे संपूर्ण भारताच्या सागरी सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. डॉकयार्डमध्ये भारतीय नौदलाच्या 'पश्चिम नौदल कमांड'चं मुख्य केंद्र आहे. अरबी समुद्रात शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी डॉकयार्ड हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे. याच ठिकाणी आयएनएस विक्रमादित्य, आयएनएस विक्रांत सारख्या युद्धनौक आणि पाणबुड्यांची देखभाल केली जात असते. त्यामुळे आगीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
advertisement
(सविस्तर बातमी लवकरच)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 12, 2026 11:59 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Naval Dockyard : मुंबईतील खळबजनक घटना, नौदलाच्या डॉकयार्ड परिसरात आगीची घटना समोर, घटनास्थळाचा VIDEO









