advertisement

सचिनला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाराच घेतोय टीम इंडियाची मजा, सापळा रचून काढला संजूचा काटा!

Last Updated:

2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये बेंचवरच बसून राहिलेल्या संजू सॅमसनला यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये अखेर खेळण्याची संधी मिळाली, पण वर्ल्ड कपच्या आपल्या पदार्पणाच्या सामन्यामध्येच संजू सॅमसनला मोठी खेळी करण्यात अपयश आलं.

सचिनला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाराच घेतोय टीम इंडियाची मजा, सापळा रचून काढला संजूचा काटा!
सचिनला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाराच घेतोय टीम इंडियाची मजा, सापळा रचून काढला संजूचा काटा!
नवी दिल्ली : 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये बेंचवरच बसून राहिलेल्या संजू सॅमसनला यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये अखेर खेळण्याची संधी मिळाली, पण वर्ल्ड कपच्या आपल्या पदार्पणाच्या सामन्यामध्येच संजू सॅमसनला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. अभिषेक शर्मा आजारी असल्यामुळे संजूला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली, पण या संधीचं संजूला सोनं करता आलं नाही. पहिल्या 7 बॉलमध्ये संजूने 3 सिक्स आणि एक फोर मारला, पण आठव्या बॉलला संजू आऊट झाला.
8 बॉलमध्ये 22 रन करून संजू माघारी परतला. डीप मिडविकेटला आणखी एक सिक्स मारायच्या नादात संजू कॅच देऊन बसला. संजूने भारताला आक्रमक सुरूवात करून दिली असली, तरी त्याला मोठा स्कोअर करता आला नाही. नामिबियाच्या टीमने संजूला सापळ्यामध्ये अडकवलं.
संजू सॅमसन आऊट झाल्यानंतर कॅमेरा नामिबियाच्या डगआउटकडे गेला, जिथे नामिबियाचे खेळाडू आणि कोच आनंदी दिसत होते. नामिबिया टीमचा मेंटर आणि सल्लागार गॅरी कर्स्टन यांच्या चेहऱ्यावरचं हसू तर अजिबात लपत नव्हतं.
advertisement
गॅरी कर्स्टन हे नाव भारतीय टीम आणि भारतीय क्रिकेट रसिकांना परिचित आहे. भारताला 2011 चा वनडे वर्ल्ड कप जिंकवून देणारे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन हे सध्या नामिबियाच्या टीमचे मेंटर आहेत. नामिबियाच्या डगआऊटमधील चित्र पाहिल्यानंतर गॅरी कर्स्टन यांनीच संजूची विकेट घेण्यासाठी सापळा रचला होता आणि हा सापळा यशस्वी ठरला, असं वाटत होतं.
advertisement
नामिबियाच्या ड्रेसिंग रूममधला आनंद फार काळ टिकला नाही, कारण त्यानंतर इशान किशनने नामिबियाच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. इशानने 24 बॉलमध्ये 254.17 च्या स्ट्राईक रेटने 61 रनची खेळी केली, ज्यात 6 फोर आणि 5 सिक्सचा समावेश होता. तर हार्दिक पांड्याने 28 बॉल 52 रन केले, त्यामुळे टीम इंडियाचा स्कोअर 20 ओव्हरमध्ये 209/9 इतका झाला. या आव्हानाचा पाठलाग करताना नामिबियाचा 18.2 ओव्हरमध्ये 116 रनवर ऑलआऊट झाला. वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेलला 2-2 विकेट घेण्यात यश आलं. अर्शदीप सिंग, शिवम दुबे आणि जसप्रीत बुमराह यांना 1-1 विकेट मिळाली.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
सचिनला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाराच घेतोय टीम इंडियाची मजा, सापळा रचून काढला संजूचा काटा!
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement