TRENDING:

Revas- Karanja Bridge: मुंबई-अलिबागकरांच्या वेळेची बचत होणार, खाडीवर रेवस- करंजा पूल कुठून- कसा उभा राहतोय?

Last Updated:

उरण ते अलिबागकरांच्या प्रवासाचा वेळ आणखीनच कमी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेमध्ये आता मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. पुलाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: अलिबागकरांसाठी एक आनंदाची बातमी म्हणता येईल. उरण ते अलिबाग प्रवास करणाऱ्यांचा फार मोठा वेळ आता वाचणार आहे. उरण ते अलिबागच्या प्रवासा दरम्यान 2 तासांहून अधिकचा वेळ लागत होता. परंतू आता प्रवासाचा वेळ कमी होऊन फक्त अर्ध्या तासांवर तो येणार आहे. मुंबई आणि अलिबागला जोडणाऱ्या आणखी एक पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 2 किलोमीटर लांबीचा हा चार पदरी पूल महाराष्ट्राच्या पश्चिम किनार पट्टीवरील प्रमुख शहरातील पायाभूत सुविधा ह्या उपक्रमाचा भाग आहे. उरणजवळील करंजा आणि अलिबागजवळील रेवस यांना थेट पुलाच्या माध्यमातून जोडण्याचे प्रमुख उद्दिष्ट सरकारचे आहे.
News18
News18
advertisement

सध्या उरण ते अलिबाग प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 70 किलोमीटरच्या मार्गाचा वापर तुम्हाला करावा लागेल, ज्यासाठी दोन तासांपेक्षा अधिकचा वेळ लागतो. सध्या फेरी सेवा १५ मिनिटांत जलद प्रवास उपलब्ध करून देत असली तरी, ती पावसाळ्यात बंद असते. त्यामुळे दरवर्षी बरेच दिवस रस्त्यावरूनच अलिबागकरांना प्रवास करावा लागतो. हा प्रवास त्यांच्यासाठी फारच वेळखाऊ ठरतो. या नव्या पुलामुळे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि अलिबाग यांच्यातील अंतर सुमारे 55 किलोमीटरवरून जवळपास 30 किलोमीटरपर्यंत कमी होऊन प्रवासी आणि मालवाहू वाहने या दोघांचीही वाहतूक सुलभ होईल, ज्यामुळे प्रादेशिक दळणवळण व्यवस्थेतही सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

advertisement

या प्रकल्पामध्ये धरमतर खाडीवर 2 किलोमीटर लांबीचा मुख्य पूल उभारला जाणार आहे. जो एकूण 10.65 किमीचा मार्ग असणार आहे. ज्याचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे. खाडीवर असणाऱ्या पुलाची उंची सुमारे 31.5 मीटर उंच असून 1.5 मीटर रुंदीच्या पादचारी मार्गाचा समावेश असेल. या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) करत असून, बांधकामाची कामे अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरद्वारे केली जात आहेत.

advertisement

एम.एस.आर.डी.सी.च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खाडीच्या भागात खांबांचे बांधकाम नियोजनानुसार सुरू असून पुलाचे काम सध्या सुरू आहे. मार्च 2028 पर्यंत पुलाचे काम संपूर्ण होण्याची अपेक्षा आहे. रेवस- रेड्डी किनारी प्रकल्पात एकूण ९ खाडी पूल असून, त्यापैकी सात पुलांचे काम आधीच सुरू झाले आहे. भूसंपादन आणि नुकसान भरपाई देण्यास होणाऱ्या विलंबामुळे प्रकल्पाच्या शेवटच्या करंजा आणि रेवस येथील कामाचा वेग मंदावला आहे.

advertisement

“या प्रकल्पासाठी जवळपास 8 किलोमीटरची जमीन संपादित करावी लागणार आहे. यामध्ये 4.5 किलोमीटर सरकारी मालकीच्या जमिनीचाही समावेश आहे. या जमिनीचा मोठा भाग शहर आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या मालकीचा आहे, ज्यांना बांधकाम सुलभ करण्यासाठी ती जमीन एमएसआरडीसीकडे हस्तांतरित करावी लागेल. याशिवाय, जमीन धारकांना आर्थिक भरपाई मिळण्यासाठी उशीर होत आहे,” अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
'एक डबा दोघांमध्ये अन् रविवारी उपाशी राहावं लागतंय' पुण्यातलं वास्तव्य, विद्यार्थी निघाले गावाकडे!
सर्व पहा

एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांकडून धरमतर खाडीवरील 2 किलोमीटर लांबीच्या पुलाच्या भागाचे काम सध्या जोरात सुरू आहे. एकदा भूसंपादनाचा प्रश्न सुटला की, प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल. पुलामुळे रायगड जिल्हा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतू कॉरिडॉर यांसारख्या प्रमुख पायाभूत सुविधांच्या माध्यमातून काम सध्या सुरू आहे. या पुलामुळे अनेक शहरांनाही आणि प्रवाशांना सुद्धा महत्त्वाचा फायदा होणार आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Revas- Karanja Bridge: मुंबई-अलिबागकरांच्या वेळेची बचत होणार, खाडीवर रेवस- करंजा पूल कुठून- कसा उभा राहतोय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल