मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आपल्याा हातात Rolex Daytona नावाच्या कंपनीचं १ कोटी किंमतीचं घड्याळ घातलं असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मुळात Rolex या कंपनीच्या घड्याळी या कोट्यवधी रुपये किंमतीच्या घरात असतात. नुकत्याच महापौर झालेल्या रितू तावडे तब्बल १ कोटींचं घड्याळ वापरत असल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्यानंतर खुद्द रितू तावडे यांनी या प्रकरणी खुलासा केला आहे.
advertisement
रितू तावडे यांनी आपल्या टि्वटर अकाउंटवरून एक पोस्ट केली आहे. "ही पोस्ट पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी आहे. माझ्या हातातील घड्याळ Michael Kors कंपनीचं आहे, ते Rolex Daytona नाही" असा खुलासा रितू तावडे यांनी केला.
तसंच, Rolex Daytona सारख्याा लाखो-कोट्यवधींची घड्याळ वापरत नाही, त्यामुळे हा प्रश्नच उद्भवत नाही. अफवा पसरवणे हा बेजबाबदारपणा आणि जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न आहे. अशा खोट्या आरोपांना मी भीक घालत नाही' असा टोलाही रितू तावडेंनी लगावला.
