किती दिवस असणार ब्लॉक
एमएसआरडीसी कडून 27 ते 31 जानेवारीदरम्यान अमरावती जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर एकूण 12 टप्प्यांत वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक महामार्गाच्या 90.500 किमी ते 170.400 किमी दरम्यान असणार आहे. या भागात धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर आणि वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्याचा समावेश आहे.
वाहतूक 45 ते 60 मिनिटे ठप्प पण कधी?
advertisement
मंगळवार ते शनिवारदरम्यान दुपारच्या वेळेत या मार्गावरील वाहतूक 45 ते 60 मिनिटांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. गॅन्ट्री उभारणीदरम्यान सुरक्षिततेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.
सविस्तर माहिती इथं पाहा
27 जानेवारी रोजी पठाणपूर येथे साखळी क्रमांक 110.400 परिसरात नागपूरकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 ते 1 या वेळेत तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. त्याच ठिकाणी मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी 3 ते 4 या वेळेत बंद राहणार आहे. तसेच धोत्रा, चांदूर रेल्वे येथील साखळी क्रमांक 125.400 परिसरात नागपूरकडे जाणारी वाहतूकही दुपारी 3 ते 4 या वेळेत तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे.
28 जानेवारी रोजी खंबाळा, चांदूर येथील साखळी क्रमांक 130.400 परिसरात नागपूरकडे जाणारी वाहतूक दुपारी 3 ते 4 या वेळेत तात्पुरती बंद राहणार आहे. प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन एमएसआरडीसी कडून करण्यात आले आहे.
