तरूणीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी नवजात बालकाला रूग्णालयात नेले होते. परंतू डॉक्टरांनी नवजात बालकाला मृत घोषित केले. 23 फेब्रुवारी रोजी रात्री 10.15 वाजता यशवंत नगर परिसरात रस्त्याच्या कडेला एका नवजात बालकाला टाकून दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर लगेचच पोलीस कर्मचारी, फॉरेन्सिक पथक आणि दोन पंच साक्षीदारांसह घटनास्थळी पोहोचले. नवजात बालकाला सांताक्रूझ पूर्वमधील व्ही. एन. देसाई रूग्णालयात हलविण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी बालकाला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
advertisement
त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी विलेपार्ले पश्चिममधील कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला. तिथे पोलिसांना बालकाच्या आईची ओळख पटवण्यात यश आले. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या मैत्रीणीसह प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदवून घेतले. पोलिसांना मिळालेल्या शवविच्छेदन अहवालामध्ये, 'आठ ते नऊ महिन्यांचा मृतजन्म झालेला गर्भ' असल्याचे नमूद करण्यात आले. पोलिसांकडून आणि फॉरेन्सिक पथकाकडून घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. या घटनेचे आणखी काही धागेदोरे मिळतायत का? याचा सध्या पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. परंतू घटनेची सविस्तर चौकशी केली जात आहे.
