TRENDING:

Bhayandar News: व्हेंटिलेटरशी लढणाऱ्या वृद्ध रुग्णाच्या हाताला उंदराने घेतला चावा, महापालिकेच्या रुग्णालयातला धक्कादायक प्रकार

Last Updated:

मीरा भाईंदर महापालिकेच्या एका रूग्णालयामध्ये पेशंटच्या आरोग्याची हेळसांड होणारा मुद्दा समोर आला आहे. मृत्यूशी झुंज देणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या हाताला उंदीर चावल्यामुळे पेशंटच्या तब्येतीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: पुन्हा एकदा मुंबईतील सरकारी रूग्णालयांमध्ये पेशंटच्या आरोग्याची कशा पद्धतीने हेळसांड केली जाते, कशा पद्धतीने दुर्लक्ष केले जाते, याचा प्रत्यय आला आहे. मीरा- भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. अतिदक्षता विभागामध्ये (ICU) मृत्यूशी झुंज देत असलेल्या एका 89 वर्षीय वृद्ध महिलेला उंदीर चावल्याचा प्रकार समोर आला आहे. हे हॉस्पिटल मीरा भाईंदर महानगर पालिकेचे आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पेशंटच्या सुरक्षेचा आणि त्याच्या तब्येतीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
News18
News18
advertisement

नेमकं प्रकरण काय?

मीरा भाईंदर महापालिकेच्या रूग्णालयात घडलेल्या या प्रकरणानंतर आता पुन्हा एकदा हॉस्पिटलमधील स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या अभावाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, 89 वर्षीय सुहासिनी माठेकर यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे 12 मार्च रोजी प्रकृती बिघडल्यामुळे पंडित भीमसेन जोशी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. 89 वर्षीय ज्येष्ठ महिलेची तब्येत गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना चौथ्या मजल्यावर असलेल्या आयसीयू वॉर्डमधील व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. 13 मार्च रोजी सकाळी, आयसीयूमध्ये आपल्या पेशंटच्या हाताला हॉस्पिटलमध्ये उंदीर चावला असल्याचे पाहून त्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

advertisement

कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी उंदराला हकलवल्यानंतर तो पळून गेल्याची माहिती त्यांनी दिली. 89 वर्षीय वृद्ध महिलेच्या कुटुंबीयांनी महापालिकेच्या हॉस्पिटलच्या ढिसाळ कारभारावर काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. "नाईट शिफ्टसाठी असलेल्या डॉक्टर आणि नर्सेस इतक्या संवेदनशील कशा? त्यांना हॉस्पिटलमध्ये उंदीर फिरत असल्याचे लक्षात आले नाही का? उंदरांचा रुग्णांना त्रास होत आहे, हे लक्षात आले नाही का? असे प्रश्न वृद्ध महिलेच्या कुटुंबीयांनी रूग्णालय प्रशासनाला विचारले आहेत. "आयसीयूसारख्या निर्जंतुक आणि अत्यंत देखरेखीखाली असलेल्या परिसरात अशी घटना घडते, म्हणजे धक्कादायक बाब आहे," अशी प्रतिक्रिया कुटुंबातील एका सदस्याने दिली. मीरा भाईंदर महापालिकेच्या हॉस्पिटलच्या ढिसाळ कारभारावरून जनतेचा रोष वाढताना दिसत आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षणासोबत केली शेती, 90 दिवसांत दीड लाख रुपयांचा नफा, भोपळ्याच्या कसा केला प्रयोग?
सर्व पहा

व्हेंटिलेटरवर असणाऱ्या पेशंटची काळजी हॉस्पिटल प्रशासनाला घेता येत नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सध्या सामान्य मुंबईकरांकडून या महापालिकेच्या रुग्णालयाच्या मॅनेजमेंटची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. आयसीयूमध्ये उंदरांचा उपद्व्याप, स्वच्छता आणि सुरक्षा नियमांचे पूर्णपणे उल्लंघन होताना दिसते. दरम्यान, त्यावेळी ड्यूटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करावी, रुग्णालयातील स्वच्छता आणि कीटक नियंत्रण उपायांचे तात्काळ ऑडिट करावे आणि अशा प्रकारची घटना पुन्हा कधीही घडू नये यासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कुटुंबाने केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Bhayandar News: व्हेंटिलेटरशी लढणाऱ्या वृद्ध रुग्णाच्या हाताला उंदराने घेतला चावा, महापालिकेच्या रुग्णालयातला धक्कादायक प्रकार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल