TRENDING:

Shocking : व्हेंटिलेटरवर असलेल्या महिलेला उंदराने कुरतडलं; भाईंदरच्या ICU मधील 'ती' भयावह दृश्यं पाहून सर्वच हादरली

Last Updated:

Mira Bhayandar hospital news : मिरा भाईंदर येथील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या 89 वर्षीय महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडलेला आहे. या घटनेने मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दिपाली मिश्रा, प्रतिनिधी
मिरा भाईंदर रुग्णालयात आयसीयूमध्ये उंदराचा चावा
मिरा भाईंदर रुग्णालयात आयसीयूमध्ये उंदराचा चावा
advertisement

मुंबई : मिरा भाईंदर शहरातील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील अत्यंत संतापजनक आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. आयसीयू सारख्या अतिदक्षता विभागातही हलगर्जीपणाचा कळस गाठल्याचे या घटनेतून दिसून येत आहे.

घडलं काय?

पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 89 वर्षीय वृद्ध महिलेच्या हाताला रात्री उंदराने कुरतडल्याची घटना उघडकीस आली आहे, यामुळे सध्या या रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, सुहासिनी माठेकर (वय 89) यांना साधारण बारा मार्च रोजी आरोग्याच्या बाबतीच तक्रार जाणवत असल्याने शहरातील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मात्र अशा महत्त्वाच्या विभागातही स्वच्छतेचा आणि सुरक्षेचा पूर्ण अभाव असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक चवीची अस्सल भेळ, पुण्यात एकाच ठिकाणी खा 3 प्रकार, किंमत 60 रुपये! Video
सर्व पहा

दरम्यानच सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास सुहासिनी याना पाहण्यासाठी त्याची नातेवाईक आयसीयू विभागात आले तेव्हाच त्यांच्या हाताला कुरतडणारा उंदीर तेथून पळून गेल्याचे त्यांना दिसून आले. गंभीर बाब म्हणजे रात्रीच्या वेळी ड्युटीवर असलेल्या डॉक्टर आणि नर्सेस यांचे लक्ष नसल्याने किंवा हा प्रकार त्यांना दिसून न आल्याचा आरोप वृद्ध महिलेच्या कुटुंबियांन केला आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला जात असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Shocking : व्हेंटिलेटरवर असलेल्या महिलेला उंदराने कुरतडलं; भाईंदरच्या ICU मधील 'ती' भयावह दृश्यं पाहून सर्वच हादरली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल