ठाणे : सध्या सायबर क्राईमचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक जण सायबर क्राईम विळख्यात अडकतात आणि त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे महाराष्ट्रातील क्विक हील ही संस्था मागील अनेक वर्षांपासून सायबर क्राईम बाबतच्या जागृती व्हावी, यासाठी काम करत आहे.
सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या कार्यक्रमांतर्गत मुंबईतील कम्प्युटर सायन्स शिकणारी मुले इतर शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन सायबर सेक्युरिटी अवेअरनेस बाबत माहिती देतात. ठाण्यातील बांदोडकर कॉलेजचे अनेक विद्यार्थी या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना सायबर सेक्युरिटी बाबत माहिती देत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांसाठी सर्वच स्तरांतून कौतुकांचा वर्षा होत आहे.
advertisement
या सायबर सेक्युरिटी अवेअरनेस मध्ये हे विद्यार्थी सेशन घेताना सायबर क्राईम म्हणजे नक्की काय?, मोबाईल वापरताना किंवा इंटरनेट वापरताना पण त्याचा कसा योग्य वापर केला पाहिजे आणि आपल्याबरोबर संकट आले तर काय करावे कोणाला कॉन्टॅक्ट करावा, याविषयी सविस्तर माहिती हे विद्यार्थी देतात.
गोकुळाष्टमीची सर्व खरेदी करा एकाच ठिकाणी, छत्रपती संभाजीनगरमधील बेस्ट मार्केट, VIDEO
'सायबर सेक्युरिटी अवेअरनेसची सध्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आणि शाळेतील मुलांना गरज आहे. आमचे क्विक हिल फाउंडेशन गेले अनेक वर्षे सायबर सेक्युरिटी अवेअरनेस वर कार्य करत आहे. आम्ही कॉम्प्युटर सायन्स विद्यार्थ्यांना मुंबईतील कॉलेजमधील आणि शाळांमधील विद्यार्थ्यांना सायबर सेक्युरिटी काय असते, याविषयी माहिती सांगण्याची संधी देतो', असे क्विक हिल फाउंडेशनचे सीएसआर हेड अजय शिर्के यांनी सांगितले.
'मी सध्याच कम्प्युटर सायन्सच्या तिसऱ्या वर्षात शिकत आहे. जेव्हा आम्ही सर्व विद्यार्थी सायबर सेक्युरिटीचे सेशन घ्यायला वेगवेगळ्या शाळांमध्ये जातो, तेव्हा शाळेतील विद्यार्थ्यांकडून आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडून खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो. मुलांना या सगळ्या गोष्टी योग्य वयात कळणं ही सध्या काळाची गरज आहे. आम्हाला हे सगळं करताना फार आनंद होत आहे', असे बा. ना. बांदोडकर कॉलेजचा विद्यार्थी साहिल पोळ याने सांगितले.
बांदोडकर कॉलेजचे विद्यार्थी सायबर क्राईम अवेअरनेस बाबत मुंबईतील अनेक शाळा कॉलेजमध्ये जाऊन सेशन घेत आहेत. याची खरंच सध्या समाजाला गरज असल्याने या मुलांवर संपूर्ण मुंबईतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.