Thane Municipal Election 2026 : ठाणे महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आज संध्याकाळीच संपूष्ठात आली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक जिल्ह्यात तिकीट न मिळालेल्या नाराजांचा गोंधळ पाहायला मिळाला.कुणी आंदोलन केलं, तरी कुणी आत्मदहनाचा प्रयत्न केला, तर कुणी नेत्यांचे फोटो फाडल्याचाही फोटो समोर आला होता.या सगळ्या राड्यारोड्यात एका घटनेने सगळ्यांचेच लक्ष वेधले होते.विशेष म्हणजे नुसतं लक्षच वेधले नाही तर अनेकजण भावूक देखील झाले होते.त्यामुळे नेमकी घटना काय घडली? हे जाणून घेऊयात.
advertisement
खरं तर आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि काल म्हणजेच सोमवारी मुंब्र्यामध्ये एका घरात महिला स्वयंपाक करताना कुकरची शिटी उडून अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात संगीता ढवले या 26 टक्के भाजल्या गेल्या होत्या. संगीता ढवले या यंदाची ठाणे महापालिकेची निवडणूक लढवणार आहेत. यासाठी त्यांनी जोरदार तयारी केली होती. आणि मंगळवारी शेवटच्या दिवशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अर्ज भरणार होत्या. पण अर्ज भरण्याआधीच त्यांच्यासोबत मोठी दुर्घटना घडली होती.
या दुर्घटनेमुळे संगीता ढवले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तसेच त्यांच्यावर उपचार देखील सूरू होते. अशा परिस्थितीत संगीता ढवले यांनी माघार घेतली नाही.याउलट त्या आज सकाळी 11.30 वाजताच्या दरम्यान मुंब्रा-कौसा येथील निवडणूक कार्यालयामध्ये ॲम्ब्युलन्सने दाखल झाल्या होत्या.
निवडणूक लढण्याची जिद्द आणि ताकद असल्यामुळे ॲम्ब्युलन्समधून संगीता ढवले या अर्ज भरण्यासाठी मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियमला पोहोचल्या होत्या. यावेळी संगीता ढवले या ॲम्ब्युलन्समधून येताना पाहून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले होते.
स्वयंपाक करताना मोठी दुर्घटना
खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षातून यंदाच्या ठाणे महापालिका निवडणूकीसाठी संगीता ढवले यांना उमेदवारी देण्यात आली होती. या उमेदवारीनंतर अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी घरात स्वयंपाक करत असताना कुकरची शिटी उडाल्यामुळे त्या भाजल्या गेल्या होत्या. या घटनेत त्यांना 26 टक्के भाजले होते.तसेच त्यांच्यावर रुग्णालयात उपचार देखील सूरू होते. या उपचारा दरम्यान आज त्यांनी ॲम्ब्युलन्समधून दाखल होऊन अर्ज दाखल केला होता. या घटनेची आता सर्वत्र चर्चा रंगली आहे.
