तज्ज्ञांच्या मते टोमॅटोमध्ये असलेले लाइकोपीन, व्हिटॅमिन ‘सी’ आणि अँटिऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे थंडीत आरोग्य टिकवण्यासाठी टोमॅटो सूप हा उत्तम पर्याय मानला जातो.
टोमॅटो सूप रेसिपी
साहित्य: टोमॅटो – 3 ते 4 (मध्यम आकाराचे), कांदा – 1 (चिरलेला), लसूण – 4 ते 6 पाकळ्या, आले- बारीक चिरलेले, तेल – 1 टेबल स्पून, काळी मिरी – ½ टीस्पून, मीठ – चवीनुसार, साखर – ½ टीस्पून (ऐच्छिक, आंबटपणा कमी करण्यासाठी), जिरेपूड-½ टीस्पून, पाणी– 1 ते 1½ कप, कोथिंबीर – सजावटीसाठी
advertisement
कृती- सर्वात पहिले वर नमूद केलेले सर्व मिश्रण भाजून घ्या. कुकर गरम करून घ्या. त्यात 1 चमचा तेल टाका. टोमॅटो, कांदा, आले आणि लसूण त्यात छान लालसर पसरवून घ्या. त्यावर मसाले, मीठ, काळी मिरी टाका. मध्यम आचेवर 10– 12 मिनिटे चांगले भाजून घ्या. (टोमॅटो थोडे काळपट दिसले तर अजून चांगला फ्लेवर येतो.) त्यात 1 ग्लास पाणी घालून कुकरला 2 शिट्या होऊन द्या.
सर्व व्यवस्थित पेस्ट तयार करा. सर्व मिश्रण थोडेसे थंड करून मिक्सरमध्ये घालून मऊ पेस्ट बनवा. शेवटी तयार झालेल्या सुपावर तुम्ही तुळशीची किंवा कोथिंबिरीची पाने टाकू शकता. त्यानंतर हे गरम सूप तुम्ही बाऊलमध्ये सर्व्ह करून घ्या. इच्छेनुसार क्रीम किंवा क्रुटॉन्स टाका.टोमॅटो सूपची चव आणि पौष्टिकता यामुळेच तरुणाईपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये याची मागणी वाढत आहे. कोणतीही अतिरिक्त क्रीम किंवा कॉर्नफ्लॉर न घालता साधे घरगुती टोमॅटो सूप अधिक आरोग्यदायी ठरते.