मध्य रेल्वेच्या ट्रान्स हार्बरवरील नेरूळ- उरण या रेल्वे स्थानकांदरम्यान प्रवाशांची रेलचेल वाढत चालली आहे. या मार्गावरील प्रवाशांची लवकरच गर्दीपासून सुटका होणार आहे. या रेल्वे मार्गावर लवकरच नवीन लोकल सुरू होणार असून लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, हार्बर मार्गावर लवकरच दोन नवीन स्थानके उभारण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना दोन नवीन स्थानके उपलब्ध होतील. ही स्थानके नेरूळ- उरण मार्गावर सुरू होणार आहेत. नवीन सुरू होणार्या स्थानकांमुळे आणि नवीन सुरू होणाऱ्या लोकलमुळे लक्षणीयरीत्या गर्दी कमी होणार आहे.
advertisement
पूर्वी नेरूळ- उरण मार्गावर 9 रेल्वे स्थानक होते, पण आता एकूण 11 रेल्वे स्थानक असणार आहेत. नेरूळ, सीवूड- दारावे, सागरसंगम, तारघर, बामनडोंगरी, खारकोपर, गव्हाण, न्हावाशेवा, रंजनपाडा. द्रोणागिरी आणि उरण असे एकूण 11 रेल्वे स्टेशन या मार्गावर आहेत. तारघर आणि गव्हाण असे दोन नवीन सुरू झालेल्या रेल्वे स्टेशनचे नाव आहेत. या दोन्हीही रेल्वे स्टेशनचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहेत. हे रेल्वे स्टेशन लवकरच जनतेसाठी खुले होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईवासीयांनी या रेल्वे स्टेशनचा नक्कीच फायदा होणार आहे. बेलापूर ते बामनडोंगरीदरम्यान, तारघर स्टेशन बांधले जाईल. तर, खारकोपर आणि न्हावाशेवा दरम्यान, गव्हाण स्टेशन बांधले जाईल.
दरम्यान, लवकरच मध्य रेल्वेकडून सीवूड्स दारावे- बेलापूर- उरण या मार्गावरील लोकल ट्रेन वाढवण्यात येणार आहे. ट्रान्स हार्बरवरील या मार्गावर 20 नवीन लोकल ट्रेन सेवा सुरु करण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरपासून सीवूड्स दारावे- बेलापूर- उरण मार्गावर नवीन रेल्वे ट्रेन सुरु केल्या जाणार आहेत. ऑक्टोबरपासून या रेल्वे मार्गावर नवीन 20 रेल्वे फेऱ्यांचा वेळापत्रकात समावेश करण्यात येईल. नवीन वेळापत्रकामध्ये 10 अप आणि 10 डाउन अशा अतिरिक्त रेल्वे फेऱ्यांचा वेळापत्रकामध्ये समावेश केला जाणार आहे. सध्या सीवूड्स दारावे- बेलापूर- उरण या रेल्वे मार्गावर फार मोठ्या फरकाने रेल्वे धावत आहे. आणखीन रेल्वेच्या संख्येंमध्ये वाढ केल्यानंतर तो फरकही आणखीनच भरून निघेल. सध्या सीवूड्स दारावे- बेलापूर- उरण मार्गावर दर एक तासाने रेल्वे धावत आहे. दुपारी गर्दी नसल्यामुळे या मार्गावर 90 मिनिटांनी ट्रेन आहे. या मार्गावरील प्रवाशांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने 1 तासांच्या फरकाने रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.