मिळालेल्या माहितीनुसार, चमोली जिल्ह्यातील पीपलकोटी जलविद्युत प्रकल्पामध्ये संध्याकाळी ही घटना घडली. या लोको ट्रेनमध्ये एकूण 109 मजूर होते. मंगळवारी रात्री 8 वाजता शिफ्ट बदल झाली होती. ट्रेन कामगारांना घेऊन जात होती. त्यावेळी ही घटना घडली. या घटनेत 5 ते 6 लोक गंभीर जखमी झाले आहेत यामध्ये काही मजूर हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
डीएम आणि एसपी रुग्णालयात पोहोचले आहेत. सर्व जखमींना अॅम्ब्युलन्सने जिल्हा रुग्णालयात पाठवलं जात आहे. सुरुवातीला 30 ते 35 लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली होती. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. दोन लोको ट्रेन एकमेकांना धडकल्याचं सांगितलं जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी चमोली गौरव कुमार यांनी दिली.
तसंच, सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सुरंगेत आता कोणीही नाही. 10 ते 12 लोकांना दुखापत झाली आहे. शिफ्ट बदलल्यानंतर कामगार ट्रेनने जात होते. सर्वांना जिल्हा रुग्णालय गोपेश्वरमध्ये दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती सेफ्टी मॅनेजर PN महंगाई यांनी दिली. तर, डीएम चमोली गौरव कुमार आणि एसपी चमोली जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
