TRENDING:

युद्ध पेटलं तरी भारताचा मार्ग मोकळा! होर्मुझच्या 'डेथ झोन'मधून ८ भारतीय जहाजांची यशस्वी एन्ट्री

Last Updated:

होर्मुझ सामुद्रधुनीत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीतही भारतीय जहाजांनी यशस्वीरित्या मार्गक्रमण करत ऊर्जा पुरवठा कायम ठेवला आहे. जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेला दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक तेल बाजारपेठा अस्थिर झाल्या असून ऊर्जा पुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा समुद्री मार्ग असलेला होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) मोठ्या प्रमाणावर बंद असल्याची स्थिती आहे. तरीही आतापर्यंत किमान आठ भारतीय जहाजांनी या सामुद्रधुनीतून यशस्वीरित्या प्रवास केला आहे.
News18
News18
advertisement

होर्मुझ सामुद्रधुनी ही जागतिक तेल व गॅस व्यापारातील अत्यंत महत्त्वाची मार्गिका असून जगातील जवळपास पाचव्या भागाइतका (20%) तेल-गॅस व्यापार या मार्गातून होतो. अमेरिका-इस्रायलच्या समन्वित हल्ल्यानंतर इराणने हा मार्ग प्रभावीपणे बंद केला होता. मात्र इराणने भारत, रशिया, चीन आणि पाकिस्तानसारख्या  मैत्रीपूर्ण देशां साठी हा मार्ग खुला असल्याचे स्पष्ट केले आहे.

आजच ‘ग्रीन सान्वी’ (Green Sanvi) नावाच्या एलपीजी टँकरने यशस्वीरित्या होर्मुझ सामुद्रधुनी पार केली असून ते आता भारताकडे येत आहे. या मार्गातून जाणारे हे आठवे जहाज ठरले आहे. याशिवाय ‘ग्रीन आशा’ (Green Asha) आणि ‘जग विक्रम’ (Jag Vikram) ही आणखी दोन जहाजे येत्या काही दिवसांत भारतात पोहोचण्याची अपेक्षा आहे.

advertisement

आतापर्यंत खालील भारतीय जहाजांनी या युद्धग्रस्त मार्गातून प्रवास केला आहे.

शिवालिक (Shivalik)

नंदा देवी (Nanda Devi)

जग लाडकी (Jag Laadki)

पाइन गॅस (Pine Gas)

जग वसंत (Jag Vasant)

बीडब्ल्यू टायर (BW Tyr)

बीडब्ल्यू एल्म (BW Elm)

ग्रीन सान्वी (Green Sanvi)

या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अजूनही 1 पेक्षा अधिक भारतीय ध्वजधारी जहाजे आखात क्षेत्रात कार्यरत असून त्यावर सुमारे ४८५ भारतीय खलाशी कार्यरत आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सांगितले आहे की, भारतीय नौदल अनेक वर्षांपासून ओमानचा आखात (Gulf of Oman) आणि अरबी समुद्र (Arabian Sea) परिसरात तैनात आहे, जेणेकरून भारतीय आणि इतर देशांच्या जहाजांच्या सुरक्षिततेची खात्री करता येईल.

advertisement

दरम्यान, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने या समुद्री मार्गावर आपले पूर्ण आणि निर्णायक नियंत्रण” असल्याचा दावा केला आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा मार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी दिलेल्या प्रस्तावालाही इराणने फेटाळले आहे.

इराणच्या संसदेत होर्मुझ सामुद्रधुनीसाठी नवीन व्यवस्थापन योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेनुसार जहाजांवर टोल आकारणे आणि काही देशांवर निर्बंध लावण्याचा प्रस्ताव आहे. अमेरिकन आणि इस्रायली जहाजांना या मार्गाचा वापर करण्यास बंदी घालण्यात येणार असून, इराणवर एकतर्फी निर्बंध लावणाऱ्या देशांनाही मर्यादा लागू केल्या जाणार आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबूचे दरात पुन्हा तेजी, कांद्या आणि केळीला काय मिळाला आज भाव? इथं चेक करा
सर्व पहा

ही योजना इराणच्या सार्वभौम नियंत्रणावर भर देत असून, या मार्गाच्या नियमनासाठी ओमानसोबत कायदेशीर चौकट तयार करण्याचाही प्रस्ताव यात समाविष्ट आहे.

मराठी बातम्या/देश/
युद्ध पेटलं तरी भारताचा मार्ग मोकळा! होर्मुझच्या 'डेथ झोन'मधून ८ भारतीय जहाजांची यशस्वी एन्ट्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल