TRENDING:

जेल की मृत्यूचा सापळा? राम मंदिर हल्ल्या प्रकरणी संशयित आतंकवादी अब्दुल रहमानची हत्या; कोणी आणि का संपवलं?

Last Updated:

अयोध्येतील राम मंदिरावर हल्ल्याचा कट रचल्याचा संशय असलेला आणि बॉम्बसह पकडलेला दहशतवादी अब्दुल रहमान याची जेलमध्येच हत्या करण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : कोणत्याही देशाची किंवा राज्याची कारागृहं (जेल) हे सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात अभेद्य ठिकाण मानलं जातं. त्यातही जर एखादा कैदी 'हाय-सिक्युरिटी' सेलमध्ये असेल, तर तिथे साधी माशीही शिरणं कठीण असतं, असं आपण मानतो. पण, हरियाणाच्या फरिदाबाद जिल्हा जेलमधून समोर आलेल्या एका बातमीने या सुरक्षेच्या दाव्यांच्या चिंधड्या उडवल्या आहेत. एका संशयित दहशतवाद्याची जेलच्या आतच हत्या झाल्याने संपूर्ण देशाच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.
अब्दुल रहमान
अब्दुल रहमान
advertisement

जेव्हा आपण 'हाय सिक्युरिटी' असा शब्द ऐकतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर सीसीटीव्ही कॅमेरे, सशस्त्र रक्षक आणि पोलादी दरवाजे येतात. सामान्य माणसासाठी या सुरक्षा भिंती भेदणे अशक्य असते. पण, याच भिंतींच्या आत जर एखाद्याचा जीव घेतला जात असेल, तर ती सुरक्षा आहे की मृत्यूचा सापळा? असा प्रश्न उभा रहातो.

अयोध्येतील राम मंदिरावर हल्ल्याचा कट रचल्याचा संशय असलेला आणि बॉम्बसह पकडलेला दहशतवादी अब्दुल रहमान याची जेलमध्येच हत्या करण्यात आली आहे.

advertisement

जेलच्या ज्या कोठडीत साधी काडी मिळणेही मुश्कील असते, तिथे अब्दुल रहमानवर जीवघेणा हल्ला झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या अंधारात ही घटना घडली. संशयित दहशतवादी अब्दुल रहमान याच्यावर धारधार शस्त्राने किंवा जड वस्तूने डोक्यावर वार करण्यात आले. या हल्ल्याचा आरोप जेलमधीलच दुसरा कैदी अरुण चौधरी याच्यावर ठेवण्यात आला आहे. या घटनेने जेल प्रशासनाचे धाबे दणाणले आहे आणि तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे.

advertisement

कोण होता हा अब्दुल रहमान? (राम मंदिर कनेक्शन)

2 मार्च रोजी गुजरात एटीएस (ATS) आणि फरिदाबाद पोलिसांनी एका संयुक्त मोहिमेत अब्दुल रहमानला पाली गावातून बेड्या ठोकल्या होत्या. अवघ्या 19 वर्षांच्या या तरुणाकडे त्यावेळी दोन जिवंत बॉम्ब सापडले होते. सुरक्षा यंत्रणांच्या तपासात एक भयानक वास्तव समोर आले होते. अब्दुल रहमान अयोध्येतील राम मंदिरावर मोठा हल्ला करण्याची योजना आखत होता. त्याच्या अटकेमुळे एक मोठा घातपात टळला होता, पण आता जेलमध्येच त्याचा अंत झाला आहे.

advertisement

अब्दुलची हत्या करणारा आरोपी अरुण चौधरी हा देखील साधा कैदी नाही. त्याला काही काळापूर्वीच जम्मू-काश्मीरमधून फरिदाबाद जेलमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. तो देखील हाय सिक्युरिटी बॅरेकमध्येच होता. या दोघांमध्ये नक्की काय बिनसले की ही टोकाची पायरी उचलली गेली? की या हत्येमागे काही मोठा कट आहे? या प्रश्नांचे उत्तर शोधण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

advertisement

एखाद्या संशयित दहशतवाद्याची, ज्याच्याकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता होती, त्याची जेलमध्ये हत्या होणे हे प्रशासनाचे मोठे अपयश मानले जात आहे. शस्त्र आले कुठून?: हाय सिक्युरिटी झोनमध्ये धारधार वस्तू किंवा हल्ला करण्यासाठी लागणारे साहित्य पोहोचलेच कसे?

सुरक्षा रक्षक काय करत होते?: रात्रीच्या वेळी जेव्हा ही घटना घडली, तेव्हा तैनात असलेले पोलीस काय झोपले होते का? अब्दुलचा आवाज कायमचा दाबण्यासाठी तर हा प्रयत्न नव्हता ना? असे अनेक प्रश्न उपस्थीत होतो.

सध्या फरिदाबाद पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. जेल प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून अरुण चौधरीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात जेलमधील इतर कोणाचा हात आहे का, याचाही कसून तपास केला जात आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गोड नाही तर तिखट, हटके मसालेदार कलिंगड, मुंबईत इथं चाखा चवं, Video
सर्व पहा

जेल ही गुन्हेगारांच्या सुधारणेसाठी असते की त्यांच्या संघर्षाचा आखाडा बनत आहे, हा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मराठी बातम्या/देश/
जेल की मृत्यूचा सापळा? राम मंदिर हल्ल्या प्रकरणी संशयित आतंकवादी अब्दुल रहमानची हत्या; कोणी आणि का संपवलं?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल