जगदीप धनखड संवैधानिक पदावर होते आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी संविधानानुसार चांगले काम केले. त्यांच्या वैयक्तिक आरोग्याच्या समस्येमुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. कोणीही जास्त ताणून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करू नये, असं अमित शहा म्हणाले.
दरम्यान, गृहमंत्र्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितले. यादरम्यान त्यांनी इतर मुद्द्यांवरही चर्चा केली. गेल्या महिन्यात राजीनामा दिल्यानंतर धनखड कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. कोणत्याही माध्यमात त्यांचे कोणतेही वक्तव्य आले नाही. अनेक खासदारांनी सांगितले की त्यांनी धनखड यांना भेटण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या खासगी सचिवाकडे वेळ ही मागितली. पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप विरोधकांनी केला होता.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 25, 2025 10:38 AM IST
मराठी बातम्या/देश/
जगदीप धनखड यांनी अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा का दिला? Amit Shah यांनी पहिल्यांदाच केला खुलासा!