TRENDING:

'ती' ऑर्डर कधीच पोहोचणार नाही, स्विगीचा डिलिव्हरी बॉय ठरला हिट ऍन्ड रनचा बळी, रस्त्यातच हृदयद्रावक शेवट!

Last Updated:

फूड डिलिव्हरीसाठी जाणाऱ्या स्विगीच्या डिलिव्हरी एजंटचा रस्ते अपघातामध्ये हृदयद्रावक अंत झाला आहे. 38 वर्षांच्या या फूड डिलिव्हरी एजंटचा शनिवारी पहाटे हिट ऍन्ड रन प्रकरणात मृत्यू झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
फूड डिलिव्हरीसाठी जाणाऱ्या स्विगीच्या डिलिव्हरी एजंटचा रस्ते अपघातामध्ये हृदयद्रावक अंत झाला आहे. 38 वर्षांच्या या फूड डिलिव्हरी एजंटचा शनिवारी पहाटे हिट ऍन्ड रन प्रकरणात मृत्यू झाला. नेपाळचा रहिवासी असलेला 38 वर्षीय सुरेंद्र बहादूर पहाटे 3.30 वाजता बंगळुरूच्या केआर पुरममधील भट्टारहल्ली सिग्नलजवळ ऑर्डर देण्यासाठी जात होता, तेव्हा एका कारने त्याच्या स्कुटरला धडक दिली, यानंतर कार चालक सुरेंद्रची मदत करण्याऐवजी तिथून पळून गेला.
'ती' ऑर्डर कधीच पोहोचणार नाही, स्विगीचा डिलिव्हरी बॉय ठरला हिट ऍन्ड रनचा बळी, रस्त्यातच हृदयद्रावक शेवट!
'ती' ऑर्डर कधीच पोहोचणार नाही, स्विगीचा डिलिव्हरी बॉय ठरला हिट ऍन्ड रनचा बळी, रस्त्यातच हृदयद्रावक शेवट!
advertisement

रस्त्यावर तडफडत असलेल्या बहादूरला पाहून रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात नेलं, पण कारच्या धडकेमध्ये सुरेंद्र गंभीर जखमी झाला होता, त्यामुळे डॉक्टरांना त्याचे प्राण वाचवण्यात यश आलं नाही. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि सुरेंद्रची स्कुटर ताब्यात घेतली. या धडकेमध्ये स्कुटरच्या समोरच्या भागाचंही मोठं नुकसान झालं आहे, ज्यावरून कारची धडक किती भीषण होती, याचा अंदाज येतो.

advertisement

डिलिव्हरी बॅगमध्ये पोलिसांना बहादूरने घेतलेल्या शेवटच्या ऑर्डर सापडल्या, ज्यात चीज जलापेनो फ्राईजचा एक भाग आणि एक व्हेजी सुप्रीम बर्गर होतं. सुरेंद्र हा 3 वर्षांपूर्वी बंगळुरूमध्ये स्थलांतरित झाला होता आणि फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीसोबत डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करत होता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रथ सप्तमीच्या दिवशी काय करावे? जाणून घ्या संपूर्ण पूजा विधी आणि महत्व
सर्व पहा

याप्रकरणी केआर पुरम ट्रॅफिक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिसांनी कार आणि ती चालवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. पोलीस अधिकारी अपघातस्थळ आणि जवळपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/देश/
'ती' ऑर्डर कधीच पोहोचणार नाही, स्विगीचा डिलिव्हरी बॉय ठरला हिट ऍन्ड रनचा बळी, रस्त्यातच हृदयद्रावक शेवट!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल