TRENDING:

90 तासांचा थरार अन् अखेर स्पेशल टीमच्या जाळ्यात अडकला lamborghini ने 6 लोकांना चिरडलेला आरोपी

Last Updated:

कानपूरचे के के मिश्रा यांचा मुलगा शिवम मिश्रा याने ८ फेब्रुवारी रोजी lamborghini कारने ६ लोकांना चिरडलं. पोलिसांच्या तपासानंतर शिवमला अटक झाली. कोर्टात हजर होणार.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रसिद्ध तंबाकू व्यवसायिकाच्या अडचणी वाढणार आहेत. 8 फेब्रुवारी रोजी lamborghini कारने त्याने ६ लोकांना चिरडलं होतं. मुलाला लपवण्याचे सगळे प्रयत्न अपयशी ठरले अखेर 90 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांना त्याच्या मुस्क्या आवळण्यात यश आलं. रातोरात अगदी बनावट ड्रायव्हर देखील उभा करण्यात आल्याची चर्चा होती, इतकंच नाही तर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या या प्रकणात पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेऊन एक स्पेशल टीम तयार केली. अखेर ९० तासांनंतर त्याच्या मुस्क्या आवळण्यात यश आलं आहे.
News18
News18
advertisement

शिवम मिश्रा याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मेडिकल टेस्टनंतर त्याला पोलिसांची स्पेशल टीम कोर्टात हजर करणार आहे. कानपूरचे प्रसिद्ध तंबाखू व्यवसायिक के के मिश्रा यांचा मुलगा शिवम मिश्रा याने ८ फेब्रुवारी रोजी lamborghini कारने ६ लोकांना चिरडलं होतं. यावेळी lamborghini कारचा स्पीड जास्त होता. त्याचा कंट्रोल सुटला आणि त्याने वाटेत दिसेल त्याला चिरडलं. या अपघातात ६ लोक जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस शिवम मिश्रा याला शोधत होते.

advertisement

शिवम मिश्रा याने गाडी चालवली नाही, असं म्हणत एक ड्रायव्हर समोर आला होता. अपघाताची जबाबदारी त्याने स्वीकारली होती. तर शिवमच्या वडिलांनीही आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे. या घटनेत इतके लूपहोल आहेत की नक्की खरं काय आणि खोट काय हे पोलिसांच्या स्पेशल टीमच्या तपासानंतर अनेक मुद्दे समोर येतील.

प्रत्यक्षदर्शींनी मात्र शिवमच गाडी चालवत असल्याचा दावा केला होता. त्यांच्या म्हणण्यांनुसार कारने आधी ऑटो रिक्षाला धडक दिली, त्यानंतर बाईकलाही उडवलं, त्यानंतर पुढे गाडी गेली. या दुर्घटनेत एकूण 6 लोक जखमी झाले होते. कानपूरमधील गाजलेल्या या हिट-अँड-रन प्रकरणात बुधवारी चालक मोहन न्यायालयात हजर झाला. त्याने त्याच्या वकिलांसह आत्मसमर्पण केलं. सरकारने आपली बाजू मांडली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, सोयाबीनच्या दरात मोठी घट, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

चालक मोहनने तोच कार चालवत असल्याचं सांगितलं. अचानक, कारमध्ये काही गडबड झाली त्यामुळे अपघात झाला. न्यायालयाने मोहनची याचिका फेटाळून लावत म्हटले की, पोलिसांच्या नोंदींमध्ये मोहनचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे, मोहनची आत्मसमर्पणाची विनंती न्यायालय स्वीकारू शकत नाही. शिवाय, न्यायालयाने पोलिसांना तांत्रिक तपासणी करून वाहन सोडण्याच्या अर्जावर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

advertisement

मराठी बातम्या/देश/
90 तासांचा थरार अन् अखेर स्पेशल टीमच्या जाळ्यात अडकला lamborghini ने 6 लोकांना चिरडलेला आरोपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल