सूर्याचं वेगळं महत्त्व
सूर्य हा पृथ्वीभोवतीच्या इतर सर्व ग्रह व ताऱ्यांपेक्षा खूप वेगळा आहे. इतर ताऱ्यांच्या तुलनेत सूर्याचं अंतर हेच त्याच्या अभ्यासाला वेगळं महत्त्व देतं. इतर ताऱ्यांच्या तुलनेत सूर्य पृथ्वीच्या खूप जवळ आहे. शतकानुशतके ऋषीमुनी-शास्त्रज्ञ त्याचं निरीक्षण करत आले आहेत. सुरुवातीपासून शास्त्रज्ञांसाठी हा अभ्यासाचा आवडता विषय आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीवर सूर्यप्रकाशाचा खोल परिणाम होत असल्यानं त्याचा अधिक अभ्यास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
advertisement
सूर्य म्हणजे काय?
मुळात सूर्य हा एक तारा आहे, आणि पृथ्वीच्या सान्निध्यात असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. पृथ्वीवरून त्याचा प्रभावही सहज जाणवतो. सूर्याची विविध प्रकारची किरणं सूर्यमालेतील दूरच्या ग्रहांपर्यंत पोहोचतात. तसेच सूर्यातून निघणारी काही किरणं दूर अंतराळात असलेल्या ताऱ्यांच्या काही सूक्ष्म किरणांना रोखण्याचं काम करतात. हा एक प्रकारे सूर्यमालेच्या मध्यभागी स्थित गरम वायू आणि प्लाझ्माचा गरम गोळा आहे. या जी प्रकारच्या ताऱ्याला पिवळ्या श्रेणीतील तारा म्हणतात.
सूर्याचा अभ्यास करण्याचं मुख्य आव्हान
सूर्याच्या अभ्यासातील सर्वात मोठं आव्हान म्हणजे तेथून येणारा भरपूर प्रकाश आणि किरणोत्सर्ग हे आहे. त्यामुळेच सूर्याच्या अभ्यासासाठी विविध उपकरणांची आवश्यकता भासते. यामध्ये प्रकाशाचे विकिरण, अतिनील किरणं, विद्युतभारित सूक्ष्म कणांचं विकिरण, रेडिओ लहरी आणि इतर अनेक लहरींचा समावेश होतो. सूर्यग्रहणासारख्या घटनांवरून असं दिसून येतं की, सूर्याच्या पृष्ठभागावर अनेक घटना घडतात, ज्याबद्दल सामान्य स्थितीच्या किरणोत्सर्गावरून जाणून घेणं शक्य नसतं.
चंद्रानंतर सूर्याकडे झेप; ISRO नं आदित्य -L1 बाबत दिली महत्त्वाची माहिती
पृथ्वीच्या पृष्ठभागावरून सूर्याबद्दल अधिक जाणून घेणं शक्य नाही
सूर्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, सूर्याजवळ जावं लागणार, हे निश्चित आहे. त्यामुळे सूर्याच्या पृष्ठभागावरून आणि त्याच्या वातावरणातून येणाऱ्या कमकुवत लहरींवरून सूर्याबद्दल जाणून घेता येईल. यासाठीचा एक मार्ग म्हणजे दुर्बिण. परंतु समस्या अशी आहे की, पृथ्वीचे वातावरण (ओझोन थर इ.) सूर्याच्या किरणांना रोखते. तसेच चुंबकीय क्षेत्रदेखील अंतराळाच्या हवामानावर परिणाम करणारे काही सूक्ष्म कणांचे सौर वारे पृथ्वीपर्यंत पोहोचू देत नाही.
म्हणून सूर्याच्या जवळ जाणे महत्त्वाचे
अशा स्थितीत एक पर्याय असा आहे की, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पृथ्वीवरून यानानं दुर्बीण अवकाशात न्यावी, आणि ती सूर्याच्या जितक्या जवळ नेता येईल, तेवढी नेण्यासाठी प्रयत्न करावा. ज्यामुळे सूर्याबद्दल अधिक माहिती उपलब्ध होईल. खरं तर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी काही अंतराळयानं पृथ्वीच्या कक्षेच्या अगदी बाहेर पाठवली गेली आहेत. परंतु त्यांच्याकडून मिळालेली माहिती फारशी तपशीलवार नाही. अशा स्थितीत अवकाशयानाच्या माध्यमातून वेधशाळा सूर्याच्या जितक्या जवळ असेल, तितकं चांगलं होईल.
सूर्याजवळ जाण्याची समस्या
सूर्याजवळ जाणं म्हणजे सूर्याचा अभ्यास करण्यासाठी एखाद्या देशानं त्याचं पाठवलेलं अवकाशयान जाळण्यासारखे ठरू शकते. त्यामुळे असा अभ्यास करताना हे लक्षात ठेवावं लागतं की, अवकाशयान हे सूर्याच्या अतिशक्तिशाली गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावात आल्यास ते जळून जाऊ शकते किंवा सूर्याच्या दिशेनं खेचले जाऊ शकते. त्यामुळे सूर्याच्या प्रभावापासून अवकाशयान वाचवण्यासाठी यानामध्ये भरपूर इंधनाची गरज भासणार आहे. यासाठी मंगळावर जाण्यासाठी लागणार्या ऊर्जेपेक्षा 55 पट जास्त ऊर्जा लागणार आहे. ज्यासाठी मानव तांत्रिकदृष्ट्या तयार नाही.
सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये लॅग्रेंज 1 स्थानावर असल्यानं ‘आदित्य एल 1’ ही पृथ्वीच्या प्रभावापासून मुक्त असणारी एक प्रकारची वेधशाळा असेल. म्हणजे दिवस आणि रात्रीच्या चक्रापासून ते मुक्त असेल. तसेच, सूर्यग्रहण त्याच्या सतत निरीक्षणात अडथळा आणणार नाही. एल 1 बिंदूवर असल्यानं, हे ऑर्बिटर सूर्याचं अविरत निरीक्षण करेल, आणि असा डेटा इस्रोला पाठवेल, जो पृथ्वीच्या पृष्ठभागावरून मिळवणं शक्य नाही. दुसरीकडे सूर्याजवळ जाण्यासाठी नासाचं पार्कर यान ग्रहांच्या कक्षेतील बल वापरून सूर्याजवळून जाईल, जेणेकरून यानाला कोणतीही इजा न होता सूर्याविषयीची माहिती उपलब्ध होईल.
दरम्यान, भारताची ‘चांद्रयान- 3’ मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता सूर्याकडे यान पाठवण्याची मोहीम देखील यशस्वी होईल, अशी आशा भारतीयांना आहे.
