TRENDING:

'तुम्ही नग्न आहात, मग कपडे उतरवायची काय गरज?'; काँग्रेसच्या गलिच्छ राजकारणावर PM मोदींचा बोचरा वार

Last Updated:

PM Modi Attack On Congress: दिल्लीतील AI समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या 'शर्टलेस' आंदोलनावर पंतप्रधान मोदींनी मेरठमधून बोचरी टीका केली आहे. "तुम्ही राजकीयदृष्ट्या आधीच उघडे पडलात, मग आंतरराष्ट्रीय पाहुण्यांसमोर कपडे उतरवण्याची काय गरज होती?" असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मेरठ: दिल्लीतील इंडिया AI Impact Summit 2026 दरम्यान झालेल्या शर्टलेस आंदोलनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर तीव्र टीका केली आहे. उत्तर प्रदेशातील मेरठ येथे विकास प्रकल्पांच्या उद्घाटनावेळी बोलताना त्यांनी या घटनेला “देशाच्या प्रतिष्ठेला धक्का” असे म्हटले.
News18
News18
advertisement

भारतामध्ये जगातील सर्वात मोठा AI Impact Summit झाला. 80 हून अधिक देशांचे प्रतिनिधी दिल्लीमध्ये उपस्थित होते. अशा प्रकारचा जागतिक दर्जाचा कार्यक्रम कोणत्याही विकसनशील देशात यापूर्वी झाला नव्हता, असे मोदी म्हणाले.

मात्र, काँग्रेसने या जागतिक कार्यक्रमाला “गलिच्छ आणि नग्न राजकारणाचे व्यासपीठ” बनवले, असा आरोप त्यांनी केला. देशाला माहीत आहे की तुम्ही आधीच राजकीयदृष्ट्या उघडे पडले आहात, मग कपडे काढण्याची गरज काय होती? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

advertisement

काँग्रेस वैचारिकदृष्ट्या दिवाळखोर

पंतप्रधानांनी पुढे म्हटले की, या घटनेतून काँग्रेस किती वैचारिकदृष्ट्या कमकुवत झाली आहे, हे दिसते. काँग्रेस नेत्यांना मोदींचा द्वेष आहे. ते माझ्यावर टीका करतात, माझ्या कुटुंबालाही लक्ष्य करतात. भाजप किंवा एनडीएला विरोध करणे समजू शकते, पण AI ग्लोबल समिट हा कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नव्हता, तो देशाचा कार्यक्रम होता, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही टीका करण्याचे धैर्य दाखवले, याबद्दल समाधान व्यक्त करत मोदींनी काँग्रेस देशावर ओझे बनल्याचा आरोप केला.

advertisement

काय घडलं होतं AI समिटमध्ये?

दोन दिवसांपूर्वी भारत मंडपम येथे सुरू असलेल्या AI Impact Summit दरम्यान युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी शर्ट काढून घोषणाबाजी केली. “Compromised PM” आणि “Pax Silica” अशी घोषवाक्ये देत ते सभागृहात फिरताना दिसले. पोलिसांनी सुमारे 10 आंदोलकांना ताब्यात घेत तिलक मार्ग पोलिस ठाण्यात नेले. हे आंदोलन काही मिनिटांत आटोपले, मात्र आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित असताना झालेल्या या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये संताप आणि आश्चर्य व्यक्त झाले.

advertisement

सहयोगी पक्षांकडूनही टीका

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. “परदेशी प्रतिनिधी उपस्थित असताना गोंधळ घालणे चुकीचे आहे. त्यामुळे देशाची प्रतिमा दुखावते,” असे ते म्हणाले. बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी या घटनेला “लाजिरवाणी आणि निषेधार्ह” म्हटले. वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी यांनीही युवक काँग्रेसच्या कृतीमुळे “सर्वांना लाज वाटली” अशी प्रतिक्रिया दिली.

राजकीय वातावरण तापले

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उचलली लेखणी, पुण्यात 'हे' पहिल्यांदाच घडतंय, Video
सर्व पहा

AI Impact Summit सारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर घडलेल्या या घटनेनंतर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे भाजपने काँग्रेसवर देशाची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला आहे, तर काँग्रेसकडूनही या आंदोलनामागील कारणांबाबत भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या/देश/
'तुम्ही नग्न आहात, मग कपडे उतरवायची काय गरज?'; काँग्रेसच्या गलिच्छ राजकारणावर PM मोदींचा बोचरा वार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल