26 ते 28 डिसेंबर 2025 दरम्यान होणाऱ्या या तीन दिवसांच्या परिषदेत एक समान विकास अजेंडा अंतिम करण्यासाठी सखोल चर्चा होईल. भारताच्या लोकसंख्येला केवळ लोकसंख्याशास्त्रीय लाभांश म्हणून न पाहता, नागरिकांना मानवी भांडवल म्हणून विकसित करण्यासाठी शिक्षण व्यवस्था बळकट करणे, कौशल्य विकास उपक्रमांना चालना देणे आणि भविष्योन्मुख रोजगार संधी निर्माण करण्यासाठी ठोस रणनीती ठरवण्यात येतील.
advertisement
केंद्रीय मंत्रालये/विभाग, नीती आयोग, राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि विविध क्षेत्रांतील तज्ञ यांच्यातील व्यापक चर्चेच्या आधारे, पाचवी राष्ट्रीय परिषद 'विकसित भारतासाठी मानवी भांडवल' या संकल्पनेवर केंद्रित असेल. या अंतर्गत राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी सर्वोत्तम पद्धती आणि रणनीतींचा आढावा घेण्यात येणार आहे.
या व्यापक संकल्पने अंतर्गत, बाल्यावस्थेतील शिक्षण, शालेय शिक्षण, कौशल्य विकास, उच्च शिक्षण, क्रीडा आणि अभ्यासक्रमेतर उपक्रम, या पाच प्रमुख क्षेत्रांवर विशेष भर दिला जाईल.
याशिवाय राज्यांमध्ये निर्बंधमुक्ती; प्रशासनातील तंत्रज्ञान: संधी, जोखीम आणि प्रतिबंधात्मक उपाय; स्मार्ट पुरवठा साखळी आणि बाजारपेठेतील दुवे यासाठी अॅग्रीस्टॅक; एक राज्य, एक जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ; आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी आणि वामपंथी अतिरेकी प्रभावानंतर भविष्यासाठी योजना या विषयांवर सहा विशेष सत्रे आयोजित केली जातील.
याशिवाय, जेवणा दरम्यानच्या चर्चासत्रांमध्ये वारसा आणि हस्तलिखितांचे जतन आणि डिजिटायझेशन आणि सर्वांसाठी आयुष - प्राथमिक आरोग्य सेवा वितरणात ज्ञानाचे एकत्रीकरण यावर केंद्रित चर्चा होईल.
गेल्या चार वर्षांपासून दरवर्षी मुख्य सचिवांची राष्ट्रीय परिषद आयोजित केली जात आहे. पहिली परिषद जून 2022 मध्ये धर्मशाळा येथे आयोजित करण्यात आली होती, त्यानंतर जानेवारी 2023 डिसेंबर 2023 आणि डिसेंबर 2024 मध्ये नवी दिल्ली येथे परिषदांचे आयोजन करण्यात आले.
या परिषदेत सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील.
