TRENDING:

मध्यरात्रीची वेळ अन् अचानक लोको पायलटच्या समोर RDX चा भयंकर स्फोट, रेल्वे ट्रॅकचे तुकडे, इंजिनचा चुराडा

Last Updated:

सरहिंद परिसरातील Khanpur फाटकाजवळ मालगाडीवर RDX स्फोट झाला. इंजिनचे नुकसान, लोको पायलट गंभीर जखमी. अमरिंदर सिंह राजा वडिंग यांनी राज्य सरकारवर टीका केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मध्यरात्रीची वेळ, किर्रर्र काळोख आणि सारं काही शांत झालेलं, मालगाडी पुढे निघाली होती. रस्ताही अगदी क्लिअर होता, मात्र अचानक लोको पायलटच्या समोर भयंकर स्फोट झाला. ४ फुटांपर्यंत रुळाचे तुकडे झाले. खडी उडाल्या आणि एका क्षणात सगळं बदललं.
News18
News18
advertisement

इंजिनचं मोठं नुकसान झालं. एका भीषण स्फोटाने परिसर हादरून गेला.पंजाबमधील सरहिंद परिसरात खानपूर फाटकाजवळ नव्याने तयार करण्यात आलेल्या रेल्वे लाईनवर एका मालगाडीला टार्गेट करून RDX चा स्फोट घडवून आणण्यात आला. या स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की रेल्वे ट्रॅकचे ४ फुटांपर्यंत तुकडे उडाले आणि मालगाडीच्या इंजिनचा चुराडा झाला आहे.

नेमकं काय घडलं?

advertisement

सरहिंद परिसरातील खानपूर फाटकाजवळून एक मालगाडी नवीन रेल्वे लाईनवरून जात होती. ही लाईन सध्या ट्रायलवर (चाचणीवर) होती. मालगाडीचे इंजिन फाटकाजवळ पोहोचताच अचानक 'RDX' चा मोठा स्फोट झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की मालगाडीचे इंजिन रुळावरून खाली उतरले आणि लोको पायलट (चालक) गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर इजा झाली असून, त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

advertisement

मोठा अनर्थ टळला, पण कट भीषण होता!

सुदैवाने ही मालगाडी होती आणि ती रिकामी होती. रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर या ट्रॅकवरून एखादी प्रवासी ट्रेन (Passenger Train) जात असती, तर शेकडो प्रवाशांचे प्राण गेले असते. हा स्फोट केवळ अपघात नसून तो रेल्वे उडवण्याचा एक सुनियोजित कट होता, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

advertisement

प्रजासत्ताक दिनापूर्वी घातपाताचा प्रयत्न?

२६ जानेवारी अवघ्या दोन दिवसांवर असताना घडलेल्या या घटनेने सुरक्षा यंत्रणांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार हा एक 'दहशतवादी हल्ला' असू शकतो, मात्र अधिकृत दुजोरा मिळणे अद्याप बाकी आहे.

पंजाबला अस्थिर करण्याचा प्रयत्न?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पोरांच्या गर्दीत लक्ष्मीने सगळ्यांना टाकलं मागे, 12 सेकंदांत जिंकला शंकरपट,Video
सर्व पहा

या घटनेनंतर पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वडिंग यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राज्य सरकारवर टीका केली आहे. "सार्वजनिक ठिकाणी RDX चा वापर होणे हा सामान्य गुन्हा नाही. हा पंजाबला अस्थिर करण्याचा आणि भीती पसरवण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे," असे त्यांनी म्हटले आहे.

मराठी बातम्या/देश/
मध्यरात्रीची वेळ अन् अचानक लोको पायलटच्या समोर RDX चा भयंकर स्फोट, रेल्वे ट्रॅकचे तुकडे, इंजिनचा चुराडा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल