TRENDING:

पोरांच्या गर्दीत लक्ष्मीने सगळ्यांना टाकलं मागे, हॅट्रटिक साधत 12 सेकंदांत जिंकला शंकरपट, Video

Last Updated:

पारंपरिक पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या शंकरपट स्पर्धांमध्ये लक्ष्मीने महिलांसाठी प्रेरणादायी असा पराक्रम करून दाखवला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येवती या छोट्याशा गावाने विदर्भात आपली ओळख निर्माण केली आहे. कारण आहे 20 वर्षीय लक्ष्मी गजानन सोनबावणे. पारंपरिक पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या शंकरपट स्पर्धांमध्ये लक्ष्मीने महिलांसाठी प्रेरणादायी असा पराक्रम करून दाखवला आहे. कृषक सुधार मंडळ, तळेगाव यांच्या वतीने दरवर्षी तळेगाव दशासर येथे विदर्भ केसरी जंगी शंकरपट स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महिलांसाठी विशेष शंकरपट आयोजित केला जातो. या प्रतिष्ठेच्या पटात लक्ष्मीने सलग तीन वर्षे विजय मिळवत हॅट्रटिक साधली आहे.
advertisement

अवघ्या 12 सेकंदांत जिंकला पट

यंदाच्या वर्षी देखील लक्ष्मीने दमदार कामगिरी करत अवघ्या 12 सेकंदांत पट जिंकत आपले वर्चस्व कायम राखले. विशेष म्हणजे हा तिचा सलग तिसरा विजय ठरला. लक्ष्मीला लहानपणापासूनच शंकरपटाची आवड होती. आपणही एक दिवस पटात उतरायचं, हे तिचं स्वप्न होतं. 2020 मध्ये तिने पहिल्यांदा पट हाकला. सुरुवातीला वडिलांना मुलीबद्दल काळजी वाटत असल्याने त्यांनी विरोध केला होता. मात्र लक्ष्मीचा आत्मविश्वास, मेहनत आणि पराक्रम पाहून वडिलांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. आज तेच वडील प्रत्येक स्पर्धेत लक्ष्मीच्या सोबत सावलीसारखे उभे असतात.

advertisement

पुण्याचा अमित झाला आम्रपाली, आता सगळे जण म्हणतात सप्तरंगी आई, काम पाहून कराल कौतुक!

शंकरपटातच नव्हे तर शेती, शिक्षण आणि घरगुती जबाबदारीतही लक्ष्मी अव्वल

शंकरपटातच नव्हे तर शेती, शिक्षण आणि घरगुती जबाबदाऱ्या यामध्येही लक्ष्मी अव्वल आहे. लक्ष्मी आणि प्रिया या दोन बहिणी असून त्यांना भाऊ नाही. त्यामुळे घरातील आणि शेतातील जबाबदाऱ्या या दोघी खंबीरपणे सांभाळतात. वडिलांना शेतकामात मदत करत कुटुंबाचा आधार बनल्या आहेत. भविष्यातही लक्ष्मीला आणखी मोठं यश मिळवायचं आहे. आई-वडिलांची स्वप्नं पूर्ण करण्याचा निर्धार तिने मनाशी केला आहे. लक्ष्मीचा हा प्रवास आज अनेक तरुणींसाठी प्रेरणास्थान ठरत असून, ग्रामीण भागातील महिलांमध्ये आत्मविश्वास आणि धाडस निर्माण करणारा आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
प्रजासत्ताक दिनासाठी व्हाइट कुर्ता, 250 रुपयांत करा खरेदी, हे आहे ठिकाण
सर्व पहा

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
पोरांच्या गर्दीत लक्ष्मीने सगळ्यांना टाकलं मागे, हॅट्रटिक साधत 12 सेकंदांत जिंकला शंकरपट, Video
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल