TRENDING:

APMC Market: कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video

Last Updated:

राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊयात. आज आपण महत्त्वाच्या शेतमालांमध्ये कांदा, द्राक्ष, केळी आणि लिंबूची आवक आणि भाव पाहूयात. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली : राज्यातील कृषी मार्केटमध्ये आज बाजारभावात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. त्यामुळे राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊयात. आज आपण महत्त्वाच्या शेतमालांमध्ये कांदा, द्राक्ष, केळी आणि लिंबूची आवक आणि भाव पाहूयात.
advertisement

कांद्याची आवक

राज्याच्या मार्केटमध्ये 2 लाख 29 हजार 020 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 76 हजार 854 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 366 ते 1175 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 4 क्विंटल कांद्यास सर्वसाधारण 2310 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

300 वर्षांचा इतिहास, प्रसिद्ध तांबट आळी आता संकटात, पुणेकरांनी का फिरवली पाठ?

advertisement

लिंबूची आवक 

राज्याच्या मार्केटमध्ये आज 751 क्विंटल लिंबूची आवक राहिली. यापैकी मुंबई बाजारात आवक झालेल्या 443 क्विंटल लिंबास 2000 ते 3000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव सर्वात कमी मिळाला. तसेच जळगाव मार्केटमध्ये आवक झालेल्या 5 क्विंटल लिंबास 10000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.

द्राक्ष आवक 

राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2122 क्विंटल द्राक्षाची आवक झाली. यापैकी मुंबई बाजारात 974 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 8000 ते 14000 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.

advertisement

केळीची आवक 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 436 क्विंटल केळीची आवक झाली. यापैकी नाशिक बाजारात आवक झालेल्या 240 क्विंटल केळीस प्रतीनुसार 2000 ते 5000 रुपये दरम्यान बाजार भाव मिळाला

मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल