advertisement

Rajya Sabha Election: राज्यसभा उमेदवारीत 'गेम' झाला, मुलाला संधी नाकारली, आनंद अडसूळांनी मनातलं सगळंच सांगितलं....

Last Updated:

Shiv Sena Shinde Faction: राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ५ वेळा खासदार राहिलेले आनंद अडसूळ यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.

राज्यसभा उमेदवारीत 'गेम' झाला, मुलाला संधी नाकारली,  शिंदेंच्या शिलेदारानं मनातली सल सांगितली...
राज्यसभा उमेदवारीत 'गेम' झाला, मुलाला संधी नाकारली, शिंदेंच्या शिलेदारानं मनातली सल सांगितली...
मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने ज्योती वाघमारे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ५ वेळा खासदार राहिलेले आनंदराव अडसूळ यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. आपल्याला दिलेला शब्द पाळला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राज्यपालपदाचा शब्द दिला होता, तो पूर्ण झाला नाही. त्याऐवजी मुलाला राज्यसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष केल्याचं आनंदराव अडसूळ यांनी म्हटले.
राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. शिवसेना शिंदे गटाकडून काही नावे चर्चेत होती. मात्र, या सगळ्या नावांवर मात करत ज्योती वाघमारे यांना मुदत संपण्याआधीच उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर शिंदे गटातील इच्छुकांमध्ये नाराजी पसरली. "दोन वर्ष झाली तरी राज्यपालपद दिलं नाही आणि आता राज्यसभेसाठीही विचार केला नाही," अशा शब्दांत अडसूळ यांनी आपली व्यथा मांडली आहे.
advertisement

शाहांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही...

आनंद अडसूळ म्हणाले की, " तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माझी अमित शाहांसोबत बैठक झाली होती. त्यावेळी मला निवडणूक न लढवण्याचा आग्रह करण्यात आला होता आणि त्या बदल्यात राज्यपाल पद किंवा तत्सम पदावर नियुक्ती करण्याचे लिखित आश्वासन दिले होते. मात्र, १० राज्यपाल पदे भरली गेली तरी माझं नाव कुठेच आलं नाही. त्यांनी पुढे म्हटले की, मला आश्वासनानंतरही राज्यपालपद नाही दिलं. शेवटी शेवटी मी ऑफर दिली होती की आता मला किमान तुमच्या कोट्यातून राज्यसभा पद तरी द्या. ही काही अवाजवी मागणी नव्हती. मात्र,आमच्या मागणीला प्रत्येक वेळी हो हो केलं जातं. पण प्रत्यक्षात काही होत नाही. हा आमचा अनुभव असून हे काही देणार नाही आणि त्यांनी दिलयं नाही, असेही अडसूळ यांनी सांगितलं.
advertisement

मुलाचाही विचार केला नाही!

राज्यसभेसाठी डावलल्याबद्दल बोलताना अडसूळ म्हणाले की, "मी ५ वेळा लोकसभेवर निवडून गेलो आहे. त्यामुळे पुन्हा संसदेत जाण्यासाठी इच्छुक होतो. जर मला संधी द्यायची नव्हती, तर किमान माझ्या मुलाचा तरी विचार करायला हवा होता, तो पक्षाचा राष्ट्रीय सचिव असून पक्ष वाढीसाठी मेहनत घेतली आहे. त्याला संधी द्यावी असे मी मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना म्हटले. मी शेवटच्या क्षणापर्यंत पाठपुरावा केला, पण आता आपण काहीही बोलणार नसल्याचे अडसूळ यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rajya Sabha Election: राज्यसभा उमेदवारीत 'गेम' झाला, मुलाला संधी नाकारली, आनंद अडसूळांनी मनातलं सगळंच सांगितलं....
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement