TV रिमोटवर लाल, पिवळे, हिरवे बटणं का असतात? अनेकांना माहितीच नाही कारण
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
सध्याच्या काळात प्रत्येकाच्या घरात टीव्ही आहे. टीव्ही म्हटलं तर रिमोट आलाच. तुम्ही तुमचा रिमोट पाहिला असेल की, त्यावर लाल, पिवळे, हिरवे आणि निळ्या रंगाची बटण असतात. पण याचा वापर काय? अनेकांना हे माहितीच नसतं. आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
advertisement
इंटरनेट येण्यापूर्वी झाली होती सुरुवात : रिमोटवर लाल, पिवळे, हिरवे आणि निळी बटणं देण्याची सुरुवात इंटरनेट येण्यापूर्वी झाली होती.खरंतर या बटणांची सुरुवात टेलेटिस्क्ससाठी झाली होती. इंटरनेट येण्यापूर्वी हे यूरोप आणि यूकेच्या एका इंफॉर्मेशन सर्व्हिस होती. यामध्ये स्क्रीनच्या खाली कलर-कोडेड लिंक दाखवले जात होते.
advertisement
advertisement
टीव्ही रिमोटवर त्यांचा उद्देश काय आहे? : ही रंगीत बटणे अजूनही अनेक कंपन्यांच्या टीव्ही रिमोटवर दिसतात. ती शॉर्टकट किंवा हॉटकी म्हणून काम करतात. याचा अर्थ असा की या बटणांना एक फंक्शन दिले जाते. बटण दाबल्याने ते फंक्शन अॅक्टिव्ह होईल. अनेक कंपन्या ही बटणे कस्टमाइझ करण्याचा ऑप्शन देखील देतात, ज्यामुळे यूझर्सना त्यांच्या आवडीनुसार कस्टमाइझ करता येते.
advertisement









