TRENDING:

कुठलं जहाज अन् कुठे वळवलं? दिल्लीच्या उत्तराने सर्वांची बोलती बंद; भारत 'अनस्टॉपेबल', 45 हजार टन LPG मंगळुरू बंदरात

Last Updated:

Crude Oil Cargo: मध्यपूर्वेतील युद्धजन्य तणावामुळे कच्च्या तेल व गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेबाबत अफवा पसरल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली/तेहरान: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थिती आणि युद्धजन्य हालचालींमुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेल व गॅस पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. महत्त्वाच्या समुद्री मार्गांवरील असुरक्षितता, जहाजांच्या हालचालींवर वाढलेले धोके आणि पुरवठ्यातील अनिश्चितता यामुळे अनेक देश सावध झाले आहेत. अशा परिस्थितीत भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेबाबतही चर्चा सुरू असून कच्च्या तेलाच्या पुरवठ्याविषयी विविध दावे आणि अफवा समोर येत आहेत.
News18
News18
advertisement

इराणमधून येणाऱ्या कच्च्या तेलाच्या (क्रूड ऑइल) एका जहाजाने भारतातील वडीनार (Vadinar) बंदराऐवजी चीनकडे वळवले अशा प्रकारच्या बातम्या आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्ट्स वस्तुनिष्ठदृष्ट्या चुकीच्या आहेत. भारत 40 पेक्षा अधिक देशांकडून कच्चे तेल आयात करतो आणि भारतीय तेल कंपन्यांना व्यावसायिक गरजेनुसार विविध देशांमधून व विविध भौगोलिक क्षेत्रांतून तेल खरेदी करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.

advertisement

मध्यपूर्वेतील पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवरही भारतीय रिफायनरी कंपन्यांनी त्यांच्या कच्च्या तेलाच्या गरजा सुरक्षित केल्या आहेत. यामध्ये इराणकडून होणाऱ्या पुरवठ्याचाही समावेश आहे. काही ठिकाणी पसरवण्यात येणाऱ्या अफवांप्रमाणे इराणकडून तेल आयातीसाठी कोणतीही पेमेंटसंबंधी अडचण निर्माण झालेली नाही.

जहाज वळवण्याच्या (वेसल डायव्हर्जन) दाव्यांकडे पाहताना तेल व्यापाराची कार्यपद्धती लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. ‘बिल ऑफ लॅडिंग’ (Bills of Lading) मध्ये नमूद केलेले गंतव्य बंदर हे अनेकदा केवळ सूचक (indicative) असते. समुद्रात असताना व्यापारातील ऑप्टिमायझेशन आणि ऑपरेशनल लवचिकतेनुसार जहाजाचे अंतिम गंतव्य बदलले जाऊ शकते. त्यामुळे अशा बदलांना चुकीच्या अर्थाने घेणे योग्य नाही.

advertisement

पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते की, येत्या काही महिन्यांसाठी भारताच्या कच्च्या तेलाच्या गरजा पूर्णपणे सुरक्षित आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरीमधून घर खर्च भागत नव्हता, दाम्पत्याने सुरू केला चपाती आणि भाकरी व्यवसाय, महिन्याची कमाई पाहाच
सर्व पहा

एलपीजी (LPG) संदर्भातही काही दावे चुकीचे ठरत आहेत. ‘सी बर्ड’ (Sea Bird) नावाचे एलपीजी जहाज ज्यामध्ये सुमारे 44 हजार मेट्रिक टन (TMT) इराणी एलपीजी आहे ते 2 एप्रिल रोजी भारतातील मंगळुरू (Mangalore) बंदरावर दाखल झाले असून सध्या तेथे एलपीजी उतरवण्याची (discharging) प्रक्रिया सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
कुठलं जहाज अन् कुठे वळवलं? दिल्लीच्या उत्तराने सर्वांची बोलती बंद; भारत 'अनस्टॉपेबल', 45 हजार टन LPG मंगळुरू बंदरात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल