TRENDING:

मातीच्या घरात लपलेल्या 'सैतानां'चा खात्मा; मोस्ट वॉन्टेड सैफुल्लाचा गेम ओव्हर, डेल्टा फोर्सने 'जैश'च्या दोघांना ठोकला

Last Updated:

Jammu And Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदचा कमांडर सैफुल्लासह दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
किश्तवाड: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड परिसरात रविवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. जैश-ए-मोहम्मदचा कमांडर सैफुल्ला याच्यासह दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. डोडा–किश्तवाड पट्ट्यातील अनेक हल्ल्यांमागे सैफुल्लाचा हात असल्याची माहिती सुरक्षा दलांनी दिली आहे.
News18
News18
advertisement

चकमकीत ठार झालेल्या दोघांपैकी एकाची ओळख जैश कमांडर सैफुल्ला अशी पटली आहे. तो पाकिस्तानी नागरिक असून काही वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करून आला होता. परिसरातील तरुणांची भरती करण्यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका होती. यापूर्वीच्या अनेक कारवायांदरम्यान तो सुरक्षा दलांना चकवा देण्यात यशस्वी ठरला होता.

भारतीय सैन्याच्या माहितीनुसार, सैफुल्ला आणि त्याचा साथीदार हे दोघेही जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. किश्तवाड जिल्ह्यातील दुर्गम भागात ‘ऑपरेशन त्राशी-1’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. चत्रू पट्ट्यातील पासेरकुट परिसरात ही चकमक झाली. कारवाईदरम्यान दोन AK-47 रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला.

advertisement

व्हाइट नाईट कॉर्प्सने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलिस, गुप्तचर विभाग (IB) आणि सैन्याच्या स्वतःच्या गुप्त माहितीच्या आधारे ही संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली होती. परिसरात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांचा माग काढून त्यांचा नायनाट करण्यासाठी ‘ऑपरेशन त्राशी-1’ राबवण्यात आले. याआधी संपर्क प्रस्थापित झाल्यानंतर रविवारी सकाळी सुमारे 11 वाजता सीआयएफ (काउंटर-इंटेलिजन्स फोर्स) डेल्टा, स्थानिक पोलिस आणि सीआरपीएफ यांच्या समन्वयाने कठीण भौगोलिक परिस्थितीत पुन्हा चकमक उभी राहिली.

advertisement

मराठी बातम्या/देश/
मातीच्या घरात लपलेल्या 'सैतानां'चा खात्मा; मोस्ट वॉन्टेड सैफुल्लाचा गेम ओव्हर, डेल्टा फोर्सने 'जैश'च्या दोघांना ठोकला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल