TRENDING:

कपाळकरंटा बाप! आईस्क्रीम खायला नेलं अन् स्विमिंग पूलजवळ काळजात धडकी भरवणारा खेळ खेळला; दोन चिमुकल्यांसह गर्भवती पत्नीचा क्रूर अंत

Last Updated:

Shocking Case: तेलंगणातील हनमकोंडा येथे पत्नीने गर्भपातास नकार दिल्याने पतीने थंड डोक्याने घृणास्पद गोष्ट केल्याचे समोर आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती: तेलंगणातील हनमकोंडा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने मुलगा होण्याच्या अट्टाहासातून आपल्या पत्नी आणि दोन लहान मुलींची हत्या केल्याचा आरोप असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
News18
News18
advertisement

आरोपी अझरुद्दीन याने आपल्या गर्भवती पत्नी फरहत (वय 26) हिला आणि त्यांच्या दोन मुली उमेरा (वय 8) आणि आयेशा (वय 6) यांना पाण्यात बुडवून मारल्याचा आरोप आहे. तिसऱ्यांदा गर्भवती असलेल्या पत्नीने गर्भपात करण्यास नकार दिल्याने पुन्हा मुलगीच होईल या भीतीने आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

अझरुद्दीन हा पन्नेला गावाच्या बाहेर आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो सिमेंट विटांच्या व्यवसायासोबतच कुटुंबाच्या मालकीचा स्विमिंग पूलही चालवत होता. त्याचे वडील रिअल इस्टेट व्यवसायात असल्याची माहिती आहे.

advertisement

बुधवारी संध्याकाळी या घटनेची सुरुवात झाली. आरोपीने आपल्या पत्नी आणि मुलींना आईस्क्रीम खरेदीच्या बहाण्याने बाहेर नेले. त्यानंतर त्यांना स्विमिंग पूल परिसरात नेले आणि तेथील CCTV कॅमेरे बंद केल्याचा आरोप आहे. त्याने प्रथम पत्नीला पाण्यात ढकलले आणि त्यानंतर दोन्ही मुलींनाही पाण्यात ढकलून त्यांचा जीव घेतला.

यानंतर आरोपीने तिघांचे मृतदेह वारंगल येथील MGM रुग्णालयात नेले आणि ते अपघाताने पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडल्याचे डॉक्टरांना सांगितले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिघांनाही मृत घोषित केले.

advertisement

ही घटना अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक दबावाशी संबंधित असल्याचेही समोर आले आहे. याआधीच्या दोन गर्भधारणांदरम्यानही अझरुद्दीनने पत्नीवर गर्भपातासाठी दबाव टाकल्याचे सांगितले जाते. कारण त्याला पुन्हा मुलगी होण्याची भीती होती. मात्र तिसऱ्यांदा गर्भवती झाल्यावर फरहतने गर्भपातास नकार दिला.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कृषी मार्केटमध्ये मोठी उलथापालथ, केळी आणि कांद्याला कवडीमोल भाव, लिंबाची काय स्थिती?
सर्व पहा

दरम्यान फरहतच्या वडिलांनी आरोपीच्या कथनावर संशय व्यक्त करत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे वृत्त आहे.

advertisement

मराठी बातम्या/देश/
कपाळकरंटा बाप! आईस्क्रीम खायला नेलं अन् स्विमिंग पूलजवळ काळजात धडकी भरवणारा खेळ खेळला; दोन चिमुकल्यांसह गर्भवती पत्नीचा क्रूर अंत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल