सोनू आणि सरोजमध्ये अनैतिक संबंध होते, हे पोलीस तपासात दिसून आलं. या दोघांनी अश्लिल व्हिडिओही बनवले. मृत जावई सोनूने सरोजच्या नावावर बिजनौरमध्ये एक जमीन खरेदी केली होती, ज्याची किंमत 20 लाख रुपयांची आहे. सोनूला ही जमीन विकायची होती, पण सासू आणि पत्नी याला विरोध करत होते.
व्हिडिओवरून ब्लॅकमेल
प्रॉपर्टीवरून वाद निर्माण झाले तेव्हा सोनूने सासू सरोजला त्यांचे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. प्रॉपर्टी विकायला नकार दिला, तर मी तुझा व्हिडिओ व्हायरल करेन, अशी धमकी सोनूने सरोजला दिली, या धमकीनंतरच हत्येचा कट रचला गेला.
advertisement
हत्येच्या रात्री फुलप्रुफ प्लानिंग
11 ऑक्टोबर 2025 च्या रात्री आई आणि मुलीने भयानक प्लान केला. दोघींनी सोनूला दुधामध्ये झोपेच्या गोळ्या दिल्या, ज्यामुळे सोनूला गाढ झोप लागली. यानंतर दोघींनी त्याची गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह फासावर लटकवला. सोनूने गळपास लावून जीवन संपवल्याचा बनाव दोघांनी रचला.
सकाळी गावामध्ये सोनूने जीवन संपवल्याची अफवा पसरली, यानंतर घाईघाईने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण सोनूचा भाऊ मोनू सैनीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सोनूची पत्नी सोनियाने आपल्या पतीला त्याचा भाऊ बोलवून घेऊन गेला होता, असं रडत सांगितलं, यावरून मोनूला संशय आला आणि तो थेट पोलीस स्टेशनला गेला. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा या हत्याकांडाचा उलगडा झाला. पोलिसांनी चौकशीसाठी दोघींना ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी हत्येची कबुली दिली. उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात झालेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.
काय म्हणाले पोलीस?
12 ऑक्टोबर रोजी सोनू सैनी नावाच्या तरुणाची हत्या करण्यात आली, यानंतर त्याने आयुष्य संपवल्याचा बनाव केला गेला. मृताच्या भावाच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केला असून सासू आणि पत्नीला अटक करण्यात आली आहे. सोनूचे त्याच्या सासूसोबत अनैतिक संबंध होते, हे तपासात समोर आलं आहे. मालमत्ता विक्रीवरून ही हत्या झाल्याचं तपासात समोर आलं आहे, अशी माहिती एएसपी प्रवीण सिंग चौहान यांनी दिली आहे.