दारू कुटुंबातील कलह आणि मृत्यूचे कारण बनली
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ही महिला तिच्या पतीच्या दारूच्या व्यसनामुळे नाराज होती, कारण तो अनेकदा दारू पिऊन घरी येत असे आणि तिला त्रास देत असे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी 35 वर्षीय कोप्पू कुमारचा मृत्यू झाला, कारण त्याची पत्नी माधवी हिने त्याच्या डोक्यावर विटेने वार केले. खरंतर, पती-पत्नीमध्ये वाद होता.
advertisement
हैदराबादच्या केशमपेटचा कोप्पू कुमार हमाली म्हणून काम करायचा आणि तो अनेकदा दारू पिऊन घरी येत असे आणि माधवीला त्रास देत असे. त्याचप्रमाणे, तो शनिवारी रात्री उशिरा दारू पिऊन घरी परतला. त्याला या अवस्थेत पाहून माधवी संतापली. तिने लगेच जवळची एक वीट उचलली आणि कुमारच्या डोक्यावर अनेक वार केले ज्यामुळे त्याचा तात्काळ मृत्यू झाला. कुमार आणि माधवीचा 12 वर्षांचा मुलगाही तिथे होता आणि त्याने त्याच्या आईला वारंवार वडिलांना सोडण्याची विनंती केली, पण माधवीने ऐकले नाही.
हत्येनंतर मृतदेह नाल्यात फेकून दिला
माधवीने संतापून कुमारची हत्या केली आणि त्यांनतर तिने मृतदेह सापडू नये म्हणून त्याचा व्हिलेवाट लावायचा प्रयत्न केला. हत्येनंतर, माधवीने कुमारचा मृतदेह घराजवळील नाल्यात फेकून दिला आणि घराबाहेर पडण्यापूर्वी शरीरावर आणि कपड्यांवरील रक्ताचे डाग साफ केले. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत पुढील तपास सुरु केला आहे.