गाडी क्रमांक 08610 विशेष
04 मार्च आणि 11 मार्च रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून 05.00 वाजता सुटेल आणि हटिया येथे दुसऱ्या दिवशी 9.00 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 08609 विशेष 02 मार्च आणि 09 मार्च रोजी हटिया येथून 4.20 वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी 12.40 वाजता पोहोचेल.
advertisement
या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगांव, पाचोरा, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा आणि राउलकेला येथे थांबा आहे.
पुणे ते दानापूर विशेष गाडीच्या 6 सेवा होतील
गाडी क्रमांक 01479 विशेष 01 मार्च, 05 मार्च आणि 09 मार्च रोजी पुणे येथून 8.55 वाजता सुटेल आणि दानापूर येथे तिसऱ्या दिवशी 8.00 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01480 विशेष 03 मार्च, 07 मार्च आणि 11 मार्च रोजी दानापूर येथून 10.00 वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी 9.15 वाजता पोहोचेल.
या गाडीला दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, मदन महल , कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., बक्सर व आरा येथे थांबा राहणार आहे.
विशेष गाडी क्रमांक 08610 यांचे आरक्षण 02 मार्चपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच संकेतस्थळावर आगाऊ आरक्षण कालावधी अंतर्गत उपलब्ध होईल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. या गाड्यांचा प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
