बीड जिल्ह्यात फेब्रुवारी 2024 मध्ये एकसारख्या चेहऱ्याचे फोटो असणारे 61270 ओळखपत्र निवडणूक विभागाच्या साॅफ्टवेअरमध्ये आढळून आलेले होते. त्यात काही पुरुषांच्या जागी महिलांचा आणि महिलांच्या जागी पुरूषांचाही फोटो असल्याची बाब समोर आली होती. 61270 पैकी 29451 मतदार बीएलओ यांना सापडले होते, अशी माहिती समोर आली होती. बाकीच्या 31819 जणांचा बीएलओंनी शोधदेखील घेतला होता. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर यातील बहुतेकजणांची नावे रद्द करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांमध्ये असा घोळ होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
advertisement
गुन्हा, तुरुंग आणि आर्थिक दंड होणार
ज्या मतदारांकडे 2 ओळखपत्र आहे, त्यांनी आत्ताच सावध व्हावं. नाहीतर एक वर्ष तुरुंगावास, आर्थिक दंड किंवा तुरुंगवास अन् दंड अशा शिक्षा होती. त्याचबरोबर सरकारी योजनांचा कोणताच फायदा मिळणार नाही. 2 मतदार ओळखपत्र असणे बेकायदेशीर आहे. प्रतिनिधीत्व अधिनियम 1950 अंतर्गत हा गंभीर गुन्हा ठरतो. लोकप्रतिनिधी कायदा 1950 च्या कलम 17 आणि 18 नुसार कोणत्याही व्यक्तीला एकापेक्षा जास्त मतदारसंघात नावाची नोंदणी करता येत नाही.
2 मतदार ओळखपत्र असेल, तर काय कराल?
तुमच्याकडे 2 मतदार ओळखपत्र असतील, तर voters.eci.gov.in किंवा nvsp.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्टर करून आणि लाॅग इन करा. त्यानंतर फाॅर्म क्रमांक 7 निवडा. त्यातील संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून सबमिट करा.
हे ही वाचा : AI ने पकडला 'तो' ट्रकचालक! पत्नीचा मृतदेह दुचाकीला बांधून नेणाऱ्या पतीची 'ती' घटना अन् पोलिसांचा शोध, वाचा सविस्तर
हे ही वाचा : MAHA TAIT Result 2025: शिक्षक भरतीचा निकाल जाहीर, 200000 उमेदवारांचं भविष्य आज ठरणार, कुठे-कसा पाहायचा
