सभागृहाला सावरकरांचं नाव
या विस्तारित वास्तूतील मुख्य सभागृहाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव देण्यात येणार आहे. स्थानिक मराठी मंडळांनी या नावाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या दौऱ्यादरम्यान रविंद्र चव्हाण यांनी मॉरिशसचे राष्ट्राध्यक्ष धरमबीर गोखुल यांची भेट घेतली. यावेळी पर्यटन, सायबर सुरक्षा आणि ब्लू इकॉनॉमी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. मॉरिशसच्या मंत्र्यांनी महाराष्ट्रातील रेशनिंग व्यवस्थेत वापरल्या जाणाऱ्या जीपीएस तंत्रज्ञानाचं विशेष कौतुक करत भारतासोबत तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
advertisement
मराठी मंदिरांना मदतीचा हात
सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी केवळ चर्चा न करता, महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे तिथल्या विविध मराठी संस्थांना अनुदानाचे धनादेशही सुपूर्द करण्यात आले. यात श्री गजानन सरस्वती मंदिर, विठोबा रखुमाई मराठा मंदिर, आणि श्री गणोबा मंदिरासह अनेक संस्थांचा समावेश आहे. 'मराठी माणसांनी सातासमुद्रापार जाऊन आपली भाषा आणि संस्कृती ज्या अभिमानाने जपली, ते पाहून ऊर भरून येतो, मॉरिशस हा भारताचा धाकटा भाऊ आहे.' अशा शब्दांत तेथून राष्ट्राध्यक्षांनी भारताचे आभार मानले. रवींद्र चव्हाण यांनी यावेळी काढले.
एआय क्षेत्रासाठी मॉरिशस ठरणार गेटवे
तंत्रज्ञानाच्या बाबतीतही हा दौरा महत्त्वाचा ठरला. मॉरिशसला आफ्रिका खंडासाठी एआयचे प्रवेशद्वार बनवण्यासाठी भारताचे सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा तिथल्या आयटी मंत्र्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, तिथल्या मंत्र्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधील आपल्या शिक्षणाच्या आठवणींना उजाळा देत भारत-मॉरिशस मैत्रीचे धागे किती जुने आहेत, हे अधोरेखित केलं. या सोहळ्यामुळे केवळ एका वास्तूची पायाभरणी झाली नसून, महाराष्ट्र आणि मॉरिशस यांच्यातील मैत्रीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे अशी प्रतिक्रिया देखील रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.
